Israel Attack Syria 
ग्लोबल

Israel Attack Syria: इस्रायलचा सीरियावर हवाई हल्ला; दोन जण ठार झाल्याचा दावा

Israel strikes targets in southern Syria: दक्षिण सीरियातील आयडीएफच्या बफर झोनचे उल्लंघन करण्यापासून रोखण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचे कॅटझ यांनी म्हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

दमास्कस: इस्रायलने सीरियावर हवाई हल्ला केला आहे. इस्रायली युद्ध विमानांनी मंगळवारी, 25 फेब्रुवारी रोजी उशिरा सीरियाच्या राजधानीच्या दक्षिणेकडील दारा या शहरावर आणि दक्षिण प्रांतात हवाई हल्ले केले, असे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सने दिले आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सीरियाच्या राजधानीत मंगळवारी रात्री उशिरा सीरियाच्या राजधानीत अनेक स्फोट ऐकू आले. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी हवाई हल्ला केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सीरियन सैन्य आणि इतर दहशतवादी गटांना दक्षिण सीरियातील आयडीएफच्या बफर झोनचे उल्लंघन करण्यापासून रोखण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचे कॅटझ यांनी म्हटले आहे.

इस्रायल सैन्य दलाने काय म्हटलंय?

या हल्ल्यांबाबत इस्रायली लष्कराने दिली माहिती दिली आहे. "गेल्या काही तासांत आयडीएफने दक्षिण सीरियातील कमांड सेंटर्स आणि शस्त्र ठिकाणांना लक्ष्य केले. दक्षिण सीरियामध्ये सैन्य दलच्या उपस्थितीमुळे इस्रायली नागरिकांसाठी धोका निर्माण झाला आहे. आयडीएफ इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि धोका दूर करण्यासाठी काम करत राहील", असे इस्रायल सैन्य दलाने म्हटले आहे.

सीरियन टीव्हीने काय वृत्त दिले आहे?

इस्त्रायली विमानांनी दमास्कसच्या दक्षिणेस सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या किस्वाह शहरावरही हल्ला केला. यावेळी लष्कराच्या एका ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले. सीरियातून येत असलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यात दोन जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. दमास्कसच्या बाहेरील भागात लष्करी वाहनांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी देखील इस्त्रायने सीरियावर हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यात इस्त्रायली सैनिक ठार झाल्याचे सांगितले जात होते. आता यावर्षी पुन्हा दोन्ही देशाता वादाची ठिणगी पडली आहे. दक्षिण सीरियामध्ये एचटीएस किंवा इतर कोणत्याही सैन्याची उपस्थिती इस्रायल सहन करणार नाही, अशी इशारा वजा धमकी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT