Israel Airstrike on Hezbollah Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Airstrike on Hezbollah: इस्रायलचा लेबनॉनमध्ये घुसून आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला; हिजबुल्लाचे दहशतवादी ठार

Israel Airstrike: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, इस्रायली लष्कराने लेबनॉनमध्ये अनेक किलोमीटर आत घुसून हवाई हल्ला केला.

Manish Jadhav

Israel Airstrike on Hezbollah:

इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, इस्रायली लष्कराने लेबनॉनमध्ये अनेक किलोमीटर आत घुसून हवाई हल्ला केला. लेबनीजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने सोमवारी लेबनीज शहर बाल्बेकच्या पश्चिमेस हवाई हल्ला केला. या हल्ल्यात हिजबुल्लाचे किमान दोन दहशतवादी मारले गेले. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.

इस्रायली सैन्याने सांगितले की, ते लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य करत आहेत. दुसरीकडे, हिजबुल्लाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. प्राचीन अवशेष आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी प्रसिद्ध असलेल्या बाल्बेक शहरापासून सुमारे 18 किमी (11 मैल) अंतरावर हा हल्ला करण्यात आला. सीरियाच्या (Syria) सीमेला लागून असलेल्या बेका व्हॅलीचा हा प्रदेश शिया गट हिजबुल्लाचा राजकीय गड आहे. इस्रायलने एकाच वेळी दोन हल्ले केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे, लेबनीज टेलिव्हिजन स्टेशन अल-जादीदने परिसरातून धुराचे लोट उठत असल्याचे फोटो प्रसारित केले. हिजबुल्ला लेबनीज-इस्रायली सीमेवर इस्त्रायली ठिकाणांना लक्ष्य करत आहे. 7 ऑक्टोबर रोजी त्याचा पॅलेस्टिनी मित्र हमासने (Hamas) इस्रायलवर केलेल्या हल्ल्यापासून, जे गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्याच्या मोहिमेचा भाग असल्याचे हिजबुल्लाचे म्हणणे आहे.

दरम्यान, 2006 च्या युद्धानंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील हा सर्वात भीषण हिंसाचार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून इस्त्रायली हल्ल्यात लेबनॉनमध्ये सुमारे 50 नागरिकांव्यतिरिक्त सुमारे 200 हिजबुल्ला दहशतवादी मारले गेले आहेत. त्याचवेळी, लेबनॉनमधून इस्रायलमध्ये झालेल्या हल्ल्यात डझनभर इस्रायली सैनिक आणि पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारामुळे सीमेच्या दोन्ही बाजूंनी हजारो लोक विस्थापित झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT