Is it possible to test Omicron at home? Find out the opinions of experts

 

Dainik Gomantak

ग्लोबल

ओमिक्रॉनची टेस्ट घरी करणे शक्य? जाणून घ्या तज्ञांचे मत

कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्टच्या अध्यक्षा एमिली वोल्क यांच्या म्हणण्यानुसार, जलद चाचण्या अजूनही डेल्टा, अल्फा किंवा ओमिक्रॉन विषाणूमुळे होत असले तरी कोविड -19 शोधू शकतात.

दैनिक गोमन्तक

जगात ओमिक्रॉन विषाणूचा (Omicron variant) संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कोरोनाचाचणी करणे आवश्यक आहे. आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणीला अधिक महत्व दिले गेले आहे. असे बरेच लोक आहेत जे संभाव्य विषाणू संसर्गासाठी तुलनेने लवकर चाचणी शोधात आहेत. यासाठी जलद प्रतिजन चाचणीचा शोध घेणे सुरु आहे.रॅपिड टेस्ट घरी केल्या जाऊ शकत नाहीत आणि 5 ते 30 मिनिटांमध्ये कोणती टेस्ट निकाल देऊ शकते यावर संसर्गजन्य रोग तज्ञ आणि सार्वजानिक आरोग्य व्यवसायिकांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेऊया. कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्टच्या अध्यक्षा एमिली वोल्क यांच्या म्हणण्यानुसार, जलद चाचण्या अजूनही डेल्टा, अल्फा किंवा ओमिक्रॉन विषाणूमुळे होत असले तरी कोविड -19 शोधू शकतात. तसेच प्राथमिक संशोधनातून असे दिसून येते कि इतर प्रकारच्या विषाणूंपेक्षा ओमिक्रॉन विषाणू शोधणे अवघड आहे.

ओमिक्रोन विषाणू प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला

ओमिक्रोन विषाणू (Omicron variant) प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला एका निवेदनात युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने या आठवड्यात जाहीर केले की जरी चाचण्या अद्याप कोरोना विषाणू शोधण्यासाठी कार्य करत असल्या तरी, अनेक नवीन रूपे उदयास आली आहेत.तसेच सांगितले की ओमिक्रॉन प्रकार शोधण्यासाठी त्यांची संवेदनशीलता कमी असू शकते. महिला वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत (south Africa) प्रथम आढळलेल्या नवीन प्रकारावर चाचण्या कशा प्रतिक्रिया देतात याचा अजूनही सखोल अभ्यास करत असल्याचे सरकारी एजन्सीने म्हटले आहे.

दरम्यान, घरगुती कोरोना (Corona) चाचणीबाबतच्या अधिकृत शिफारशी बदललेल्या नाहीत, जेव्हा जलद निकाल महत्वाचा असेल तेव्हा लोकांनी ते वापरणे सुरु ठेवावे. अँथनी फौसी अमेरिकेचे शीर्ष संसर्गजन्य रोग तज्ञ यांच्या मते,ओमिक्रॉनचा शोध घेण्यासाठी घरातील कोरोना चाचणीची संवेदनशीलता सध्या कमी असू शकते,तरीही एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे कि नाही हे एक चांगले सूचक आहे. मग ते काहीही असो चाचणी करणे महत्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT