Dolphins
Dolphins Dainik Gomantak
ग्लोबल

Video: हमासची हेरगिरी करण्यासाठी इस्राइल देतोय डॉल्फिनला प्रशिक्षण?

दैनिक गोमन्तक

हेरगिरीच्या जगात ईस्रायलचा हात कोणीही धरू शकत नाही. त्यातही इस्राईलची (Israel Navy) मोसाद ही एजन्सी शत्रू देशांची हेरगिरी करण्यासाठी अशा पद्धती वापरते, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. यापैकीच एक म्हणजे डॉल्फिनचा वापर विशेषतः हेरगिरीसाठी केला जातो. यासाठी त्यांना खास असं प्रशिक्षण दिले जाते. खरं तर, अतिरेकी गट हमासने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात आरोप केला आहे की त्यांच्या ड्रायव्हरने इस्रायलने प्रशिक्षित केलेल्या एका डॉल्फिनला (Dolphins) मारले आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हार्नेस दाखवण्यात आला आहे. डॉल्फिनला मुद्दाम मारल्याचा दावा हमासने केला आहे.

डॉल्फिनच्या नाकात हार्नेस बसवण्यात आला होता. हे यूएस आणि रशियन नौदलात वापरल्या जाणार्‍या हार्नेससारखे आहे. हार्नेसला भाल्याच्या बंदुकीसारखे उपकरण जोडलेले होते. डॉल्फिन मित्र किंवा शत्रू यांच्यात फरक करू शकत नाही. म्हणूनच ते प्राणघातक हल्ला करत नाहीत. मात्र, लक्ष्य कुठे आहे हे शोधण्यासाठी डॉल्फिन (Dolphins) उपयुक्त ठरू शकतो. हार्नेस डिव्हाइस समान सिस्टिमचा एक भाग असू शकतो, असे मत संरक्षण तज्ज्ञ एचआय सटनने व्यक्त केले आहे.

सटन म्हणाले की, हार्नेस इस्राईलचा किंवा डॉल्फिन असल्याची खात्री करण्यासाठी कोणताही पुरावा उपलब्ध नाही. मात्र हा इस्रायलच्या नौदलाचा सागरी सस्तन प्राणी असू शकतो असा दावा काही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. रशियन नौदलाने सर्वसमावेशक सागरी प्राणी सिस्टिमचा एक भाग म्हणून सिरियातील टार्टस येथे डॉल्फिन तैनात केले. त्यामुळे हे प्रकरण 'किलर डॉल्फिन्स'चे असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

हमासने इस्राइलचा गुप्तहेर मासा पकडला

2015 मध्ये, पॅलेस्टिनी वृत्तपत्र अल-कुड्सने दावा केला होता की हमासने डॉल्फिनला ताब्यात घेतले होते, ज्याचा वापर इस्राइलचे नौदल त्यांच्या सशस्त्र विंगच्या सदस्यांवर हल्ला करण्यासाठी करत होता. सूत्रांचा हवाला देत वृत्तपत्राने म्हटले होते की, इस्रायलच्या डॉल्फिनला गाझा पट्टीच्या किनाऱ्यावर पकडण्यात आले. हमासच्या नौदल कमांडोना डॉल्फिन 'संशयास्पद हालचाली' करताना दिसला होता.

डॉल्फिन कॅमेरानी सशस्त्र

हमासने डॉल्फिनचा पाठलाग केला तेव्हा त्यांना आढळले की पाण्याखालील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना एक उपकरण लावण्यात आलं आहे. हमासच्या डायव्हर्सना डॉल्फिन पकडून किनाऱ्यावर नेण्यात यश आल्याचा दावाही करण्यात आला. डॉल्फिनमध्ये रिमोट कंट्रोल मॉनिटरिंग डिव्हाइस आणि कॅमेरा असल्याचे तपासात आढळून आले. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की डॉल्फिनमध्ये आढळलेले हे उपकरणं लहान बाण सोडण्यास आणि कोणालाही मारण्यास, गंभीरपणे जखमी करण्यास सक्षम होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tristate Meet: गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक पहिल्यांदाच समन्वय बैठक का घेतायेत? कोणत्या विषयावर होणार चर्चा

ED Goa: गोव्यातील विपुल शिपयार्ड कंपनीवर ईडीचा छापा, 12.20 कोटींची मालमत्ता जप्त

SBI FD Interest Rates: एसबीआयच्या करोडो ग्राहकांचे बल्ले-बल्ले, आजपासून नवीन व्याजदर लागू; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ?

Goa Indore Flight: खराब हवामानाचा फटका! एक तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला

India Iran Chabahar Deal: भारत आणि इराण यांच्यातील करारावर महासत्ता ‘खफा’; जाणून भारतासाठी चाबहार बंदर का महत्त्वाचं आहे?

SCROLL FOR NEXT