Iranian Commandos Military Exercise Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Iranian Commandos Military Exercise: इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असतानाच इराणने अमेरिकेला थेट लष्करी आव्हान दिले.

Manish Jadhav

Iran Press TV War Drill Video : मध्यपूर्वेतील तणाव आता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन ठेपला. इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असतानाच इराणने अमेरिकेला थेट लष्करी आव्हान दिले. इराणच्या अधिकृत 'प्रेस टीव्ही'ने एक विशेष व्हिडिओ प्रसारित केला, ज्यामध्ये इराणचे कमांडोज आणि लष्करी दले युद्धाचा सराव करताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या शेवटी "या, आम्ही तुमची वाट पाहत आहोत," असा मेसेज देण्यात आला, ज्यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली. हा व्हिडिओ केवळ सराव नसून अमेरिकेला दिलेली एक उघड धमकी मानली जात आहे.

प्रसारित करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये इराणी सैनिक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह युद्धभूमीवर सराव करताना दिसत आहेत. यामध्ये मोठे मिसाइल लॉन्चर वाहने, कमांडोजचे थरारक स्टंट्स आणि गोळीबाराचे दृश्य दाखवण्यात आले आहेत. पार्श्वभूमीला असलेल्या नाट्यमय संगीतामुळे या व्हिडिओचा प्रभाव अधिकच वाढला असून इराण कोणत्याही संघर्षासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे यात दर्शवण्यात आले. ठिकठिकाणी होणारे स्फोट आणि इराणी सुरक्षा दलांची आक्रमक हालचाल हे स्पष्ट करते की, तेहरान अमेरिकेसमोर झुकण्यास तयार नाही.

दुसरीकडे, व्हाईट हाऊसने या परिस्थितीवर भाष्य करताना स्पष्ट केले की, मध्यपूर्वेत अतिरिक्त अमेरिकन सैनिकांची तैनाती ही केवळ संरक्षणात्मक रणनीती आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लीविट यांनी सांगितले की, या तैनातीमुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या संघर्षात अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. जरी पडद्यामागे राजनैतिक चर्चा आणि युद्धविरामासाठी प्रयत्न सुरु असले तरी जमिनीवर अमेरिकेने (America) आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला. अमेरिकेच्या मते, हे पाऊल रणनीतिक लवचिकता राखण्यासाठी उचलण्यात आले.

काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई मारले गेले, त्यानंतर इराणमध्ये संतापाची लाहर उसळली. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले करण्याचे सत्र सुरुच आहे. युद्ध सुरु होऊन अनेक दिवस उलटले असले, तरी ना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प मागे हटण्यास तयार आहेत, ना इराण शांत बसण्यास. दोन्ही देशांमधील संवाद खुंटला असून केवळ लष्करी शक्तीच्या प्रदर्शनावर भर दिला जात आहे.

इराणने (Iran) प्रसिद्ध केलेला हा ताजा व्हिडिओ जागतिक शांततेसाठी धोक्याची घंटा मानला जात असून या आव्हानानंतर अमेरिका काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. इराणमधील हा संघर्ष आता केवळ प्रादेशिक न राहता जागतिक युद्धाचे रुप घेतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: युतीच्या चर्चेला मुहूर्त, विजय-गिरीश यांची मडगावात भेट; जागावाटपावर मात्र 'ब्र'ही नाही

Peru Tourist Plane Crash: पेरूमध्ये भीषण दुर्घटना! पर्यटकांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; पायलटसह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू VIDEO

Horoscope: संकष्टी चतुर्थीला गणरायाची विशेष कृपा! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, समृद्धी, नोकरीची संधी आणि धनवर्षाव

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

SCROLL FOR NEXT