Iran Rejects Pakistan as Mediator Dainik Gomantak
ग्लोबल

Iran US Tension: 'पाकिस्तान आमचा मित्र, पण निष्पक्ष नाही', इराणनं पाकड्यांना दाखवली जागा; मध्यस्थ म्हणून स्वीकारण्यास नकार

Iran Rejects Pakistan as Mediator: इराण आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकालीन तणाव कमी करण्यासाठी सुरु असलेल्या राजनैतिक प्रयत्नांना मोठा धक्का बसला.

Manish Jadhav

Iran Rejects Pakistan as Mediator: इराण आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकालीन तणाव कमी करण्यासाठी सुरु असलेल्या राजनैतिक प्रयत्नांना मोठा धक्का बसला. या दोन्ही देशांमधील वाद सोडवण्यासाठी पाकिस्तानने मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र इराणने पाकिस्तानची ही भूमिका स्पष्टपणे फेटाळून लावली. इराणच्या संसदीय राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आयोगाचे प्रवक्ते इब्राहिम रेजाई यांनी पाकिस्तानच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, मध्यस्थ म्हणून पाकिस्तान आम्हाला मान्य नसल्याचे जाहीर केले.

इब्राहिम रेजाई यांनी अत्यंत कडक शब्दांत पाकिस्तानची कानउघाडणी केली. ते म्हणाले की, "एक मध्यस्थ म्हणून जो देश भूमिका बजावतो, त्याने पूर्णपणे निष्पक्ष असणे आवश्यक असते. मध्यस्थ कोणत्याही एका बाजूला झुकलेला नसावा. पाकिस्तान हा आमचा शेजारी आणि चांगला मित्र देश नक्कीच आहे, पण जेव्हा आंतरराष्ट्रीय कूटनीतिक चर्चा आणि मध्यस्थीचा प्रश्न येतो, तेव्हा पाकिस्तान या भूमिकेसाठी अजिबात पात्र नाही." पाकिस्तानचा कल हा अनेकदा दुसऱ्या बाजूकडे (अमेरिकेकडे) अधिक असतो, जो चर्चेच्या मूळ भावनेच्या विरोधात आहे, असे मत इराणने व्यक्त केले.

अमेरिकेचा दबाव आणि पाकिस्तानचे मौन

रेजाई यांनी पाकिस्तानची असमर्थता अधोरेखित करण्यासाठी एका जुन्या प्रकरणाचा दाखला दिला. त्यांनी आरोप केला की, पाकिस्तानमध्ये जगासमोर सत्य मांडण्याचे धाडस नाही. "अमेरिकेने यापूर्वी पाकिस्तानचा एक प्रस्ताव मान्य केला होता, पण नंतर अमेरिका आपल्या शब्दावरुन फिरला. ही गोष्ट जगाला सांगण्याची हिंमत पाकिस्तानने दाखवली नाही," असे रेजाई यांनी म्हटले. लेबनॉन संकट आणि इराणच्या गोठवलेल्या मालमत्तांबाबत अमेरिकेने अनेक आश्वासने आणि करार केले होते, पण नंतर त्यांनी आपली वचनबद्धता पाळली नाही. या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अमेरिकेवर दबाव निर्माण करण्यात किंवा सत्याची बाजू मांडण्यात पाकिस्तान पूर्णपणे अपयशी ठरला, असा घणाघाती आरोप इराणने केला.

पाकिस्तानच्या प्रतिमेला मोठा तडा

इराणच्या (Iran) या भूमिकेमुळे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. पाकिस्तान नेहमीच स्वतःला मुस्लिम देश आणि पाश्चिमात्य जगामधील एक दुवा (Bridge) म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, इराणने थेट नकार दिल्यामुळे पाकिस्तानची ही 'सेतू'ची भूमिका आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली. इराणने स्पष्ट केले की, जो देश अमेरिकेच्या प्रभावाखाली आहे, अशा कोणत्याही देशाची मध्यस्थी आम्हाला मान्य नाही.

इराणच्या या कडक भूमिकेमुळे आता अमेरिका आणि इराणमधील संवाद पुन्हा एकदा ठप्प होण्याची चिन्हे आहेत. इराण आता केवळ अशाच देशांवर विश्वास ठेवण्यास तयार आहे जे अमेरिकेच्या दबावाखाली न येता स्वतंत्रपणे भूमिका घेऊ शकतात. या घडामोडींमुळे दक्षिण आशिया आणि मध्यपूर्वेतील राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानसाठी (Pakistan) हा मोठा राजनैतिक पराभव मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT