Iran israel war america bomb  X
ग्लोबल

Bunker Buster Bomb: अमेरिकेच्या भात्यातील घातक अस्त्र! जमीन भेदत जाणारा 'बंकर बस्टर बाँब'; ‘बी-२ बॉम्बर’ विमानांचा उपयोग

GBU-57/B Bunker Buster Bomb: इराणमधील जमिनीखाली खोलवर असलेल्या फोर्दो अणुकेंद्रावर हल्ला फक्त बंकर बस्टर या बाँबमध्येच असल्याने आणि हा बाँब फक्त अमेरिकेकडेच असल्याने इराणवर असा हल्ला होण्याची शक्यता होती.

Sameer Panditrao

इराण: इराणमधील डोंगराळ भागात जमिनीखाली खोलवर असलेल्या फोर्दो अणुकेंद्रावर हल्ला फक्त बंकर बस्टर या बाँबमध्येच असल्याने आणि हा बाँब फक्त अमेरिकेकडेच असल्याने इराणवर असा हल्ला होण्याची शक्यता होती, ती खरी ठरली. अमेरिकेने बाँबर विमानातून ‘जीबीयू-५७/बी’ म्हणजेच, बंकर बस्टर बाँबचा वापर करत या अणुकेंद्राचे मोठे नुकसान घडवून आणले. प्रचंड स्फोटके भरलेला हा बाँब म्हणजे अमेरिकेच्या भात्यातील सर्वांत घातक अस्त्रांपैकी एक मानले जाते.

असा आहे बंकर बस्टर...

विमानातून टाकल्यानंतर स्फोट होण्यापूर्वी जमीन भेदत खोलवर जाणाऱ्या बाँबला बंकर बस्टर म्हणतात. अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रावर १३ हजार ६०० किलो इतक्या प्रचंड वजनाचा ‘जीबीयू-५७/बी’ हा बंकर बस्टर बाँब टाकला. हा बाँब जमीन दोनशे फूट खोलपर्यंत भेदत जातो आणि नंतर त्याचा स्फोट होतो. ही खोली जमीन किंवा पृष्ठभाग कोणत्या प्रकारची आहे, यावरून अवलंबून असते. एकाच भागात एकानंतर एक बाँब टाकले तर आणखी खोलवर मारा करता येतो. अमेरिकेने आज किती बाँब वापरले, ते जाहीर करण्यात आलेले नाही.

अमेरिकेकडे असलेले ‘बीएलयू-१०९’, ‘जीबीयू-२८’ हे देखील बंकर बस्टर आहेत. मात्र, त्यांची क्षमता कमी आहे. उच्च दर्जाचे काँक्रिट वापरले असेल तर ‘जीबीयू-५७/बी’ हा २५ फूट खोलीपर्यंतच भेदत जाऊ शकतो. मात्र, रोधक क्षमता कमी असलेल्या पदार्थापासून बांधकाम केले असल्यास बाँब आणखी खोलीपर्यंत जातो.

सर्वसाधारण बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या काँक्रिटपासून जमिनीखाली बांधकाम केले असल्यास बाँब १५० ते २०० फूट खोलीपर्यंत जातो. बाँब विमानातून सोडल्यावर लक्ष्यभेद करण्यासाठी ‘जीपीएस’चा वापर होतो. हा बाँब स्वनातीत वेगाने लक्ष्याच्या दिशेने जातो. बाँबच्या टोकाला पोलादाचे गोलाकार नाक असते. कवचही पोलादाचे असते. जमिनीवर कोसळताच गोलाकार नाकामुळे प्रतिरोधी बल विभागले जाऊन बाँबला खोलपर्यंत जाता येते. बाँब योग्य खोलीपर्यंत पोहोचल्यावर संगणकीकृत फ्युजच्या साह्याने स्फोटकांचा स्फोट घडवून आणला जातो.

शक्तिशाली ‘बी-२ बॉम्बर’

इराणवरील हल्ल्यादरम्यान अमेरिकेने प्रचंड शक्तिशाली अशा बी-२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर विमानांचा उपयोग केला. या विमानांचा उपयोग अमेरिकेने यापूर्वी इराक, लीबिया, अफगाणिस्तान या देशांमधील विविध युद्ध आणि मोहिमांदरम्यान केला आहे.

विमानाची वैशिष्ट्ये

‘बी-२’चे पहिले उड्डाण जुलै १९८९ मध्ये झाले. मात्र, अमेरिकेच्या हवाई दलात ते सन १९९७ पासून नियमितपणे वापरले जावू लागले.

हे विमान हवाई संरक्षण प्रणाली भेदते. अणु संशोधनासाठी बनवलेल्या बंकरसारख्या भूमिगत इमारतींना अचूक लक्ष्य करते.

हे विमान मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटरसह विविध शस्त्रास्त्रे वाहून नेऊ शकते.

अमेरिकी हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रडार किंवा अन्य यंत्रणावर बी-२ विमानाची दृश्यमानता अतिशय कमी आहे. कमी आवाज, रडारची वैशिष्ट्ये, कमी इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सर्जन आणि अवरक्त किरणांचे कमी उत्सर्जन यांमुळे हा परिणाम दिसून येतो.

निर्मिती : नॉरथॉप ग्रुमन कंपनी

निर्मितिमूल्य २.१ अब्ज डॉलर

अमेरिकेकडील विमाने १९

इंधन भरल्यानंतर पल्ला ६,००० सागरी मैल

शस्त्रास्त्रे वहनक्षमता १८१४४ किलो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco ATM Scam: एटीएममध्ये पैसे भरणारेच निघाले चोर! खासगी कंपनीच्या 5 कर्मचाऱ्यांनी लंपास केले 14 लाख; वास्कोतील धक्कादायक प्रकाराने खळबळ

Goa Tiger Symbolism: वाघाच्या पुढच्या 2 पायांमध्ये रानडुक्कर, तर मध्ये छोटेखानी सिंह; वागऱ्यागाळ येथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

Vaibhav Suryavanshi Century: 15 षटकार 11 चौकार...! 32 चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, कतारमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ VIDEO

Viral Video: भर रस्त्यात काकाची 'दारु पार्टी'! कुणाचीही हटवण्याची हिंमत नाही, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, "काका ऑन रॉक"

VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

SCROLL FOR NEXT