Iran's Foreign Minister Hossein Amir Abdullahian Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Iran Tensions: आमची मुलं अशा शस्त्रांनी खेळतात... इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायलची उडवली खिल्ली; थेट तेल अवीववर हल्ला न करण्याचंही दिलं कारण!

Israel Iran Tensions: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील स्ंघर्ष शिगेला पोहोचला आहे.

Manish Jadhav

Israel Iran Tensions: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील स्ंघर्ष शिगेला पोहोचला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायल आणि इराणमध्ये तणाव वाढला. इराणने इस्रायलवर सीरियातील आपल्या वाणिज्य दूतावासावर हल्ला केल्याचा आरोप केला. यानंतर 13-14 एप्रिलच्या रात्री इराणकडून इस्रायलवर थेट हल्ला करण्यात आला. इराणकडून इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि रॉकेट डागण्यात आले. त्यानंतर चार दिवसांनी इस्रायलकडूनही प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात आली. शुक्रवारी पहाटे इस्रायलने इराणवर हल्ला करुन त्यांच्या लष्करी तळाला लक्ष्य केले. इस्रायलच्या हल्ल्यानंतर आता इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य आले आहे. हा हल्ला गांभीर्याने घेऊ नका असे त्यांनी म्हटले आहे.

इस्रायली हल्ल्याच्या एका दिवसानंतर, इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लायान म्हणाले की, ''इस्रायली सैन्याने वापरलेली शस्त्रे इराणी मुले खेळण्यात वापरतात. आमची मुले अशा हत्यारांनी खेळतात.'' एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अब्दुल्लायान यांनी संघर्ष न वाढवण्याचे आवाहनही केले. जोपर्यंत इस्रायल आमच्या हिताच्या विरोधात कोणताही नवा उद्धटपणा करत नाही तोपर्यंत आमच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही, असेही ते म्हणाले.

'इस्रायलने सुरुवात केली तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ'

अब्दुल्लायान पुढे म्हणाले की, ''जर इस्रायलने आमच्या देशाविरुद्ध निर्णायक कारवाई केली तर आम्हीही गप्प बसणार नाही. आम्हीही जशाच तसे उत्तर देऊ. आम्ही अशा प्रकारे प्रत्युत्तर देऊ की, इस्रायलला पश्चात्ताप करावा लागेल. आमच्याकडून करण्यात आलेला हल्ला हा एक इशारा होता. आम्हाला संदेश द्यायचा होता की, आम्ही तेल अवीववर हल्ला करु शकतो आणि इस्रायलच्या आर्थिक बंदरांनाही लक्ष्य करु शकतो.''

अब्दुल्लायान पुढे असेही म्हणाले की, ''इराणने हैफा, तेल अवीव किंवा कोणत्याही मोठ्या बंदरावर हल्ला केला नाही याचे एकमेव कारण म्हणजे आम्हाला नागरिकांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता. आमचे केवळ लष्करी उद्दिष्ट होते. इराणने मोठ्या प्रमाणावर केलेल्या हल्ल्यात शेकडो यूएव्ही आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि रॉकेट इस्रायलवर डागण्यात आली.'' दरम्यान, इस्रायलने आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या मदतीने हे हल्ले यशस्वीपणे रोखले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Government Job: लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळ! 100 पदांसाठी हजारोंची गर्दी, तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत

Goa: गोव्याच्या विद्यार्थिनीचा आवाज घुमला राजस्थानात! 'वनिष्ठा'चे युवा संसदेत प्रतिनिधित्व; दहशतवादावर मांडले परखड विचार

Ganesh Idol: स्वतः 'गणेशमूर्ती' तयार करण्याचा आनंद वेगळाच! शिल्पकलेची कार्यशाळा

Goa Assmbly Live: साकवाळचे सचिव ऑरविले व्हॅलेस यांना निलंबित, डीओपीने त्यांच्यावर कारवाई केली नाही

SCROLL FOR NEXT