Donald Trump Iran Jail Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवणारा एक व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ट्रम्प इराणच्या तुरुंगात बंद असल्याचे दिसत आहेत. इराणमधील एका विवाहस्थळी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तेहरानमधील 'ताज्रिश स्क्वेअर'वर हा डिजिटल बिलबोर्ड झळकवण्यात आला. विशेष म्हणजे, या बिलबोर्डमध्ये ज्या व्यक्तीला कैदी म्हणून दाखवण्यात आले आहे ते प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प नसून ट्रम्प यांचा हुबेहूब मास्क आणि विग परिधान केलेला एक अभिनेता आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक छोटी कोठडी तयार करण्यात आली असून, ट्रम्प यांच्या वेशातील ती व्यक्ती बाहेर पडण्यासोबत झोप घेत असल्याची दिसते. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा उपहासात्मक व्हिडिओ समोर आला. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने आगामी काळात इराणवर मोठे हल्ले करण्याची धमकी दिली असून, याला प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील होर्मुजमधील इंटरनेट केबल उद्ध्वस्त करण्याची तंबी दिली.
इराण सरकारने या बिलबोर्डच्या माध्यमातून अमेरिकेला कडक इशारा दिला असून, भविष्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची अशीच अवस्था होईल, असे यातून दर्शवण्याचा प्रयत्न केला. हा अजब नजारा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
दुसरीकडे, अमेरिका (America) आणि इस्रायलने नोव्हेंबर महिन्यात इराणवर हल्ले करण्याची रणनीती आखली आहे. या हल्ल्यात इराणचे महत्त्वाचे अण्वस्त्र तळ आणि ऊर्जा-तेल प्रकल्पांना लक्ष्य करुन ते उद्ध्वस्त करण्याची तयारी सुरु आहे. याच युद्धाच्या तयारीचा एक भाग म्हणून इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गस्ती उड्डाणे घेत जोरदार शक्ती प्रदर्शने केली. सीरिया आणि इराकच्या हवाई क्षेत्रावरुन जात इराणच्या सीमेपर्यंत येऊन ही विमाने परतली.
दरम्यान, इराणने अमेरिकेसमोर चर्चेसाठी काही अटी ठेवल्या आहेत, तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवर पुन्हा अण्वस्त्रे बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे आता या संघर्षात निर्णायक युद्ध पुकारण्याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेणार असल्याचे बोलले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.