INS Mormugao: प्रोजेक्ट 15-बी युद्धनौका बांधणी प्रकल्पातील सर्वांत अत्याधुनिक क्षेपणास्त्रक्षम विनाशिका ‘आयएनएस मुरगाव’ हिला मागील वर्षी डिसेंबरमध्ये नौदल गोदीतील विशेष समारंभात नौदल ताफ्यात दाखल करून घेण्यात आले. आयएनएस मुरगाववर क्षेपणास्त्राची घेण्यात आलेली पहिलीच चाचणी यशस्वी झाली आहे. मुरगाववरून डागण्यात आलेल्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र गोळीबार करून लक्ष्य यशस्वीपणे नष्ट केले.
भारत आता पाण्यावरून देखील चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांवर हल्ला करत तेथील घरांना काही मिनिटांत आग लावू शकतो. प्रोजेक्ट 15B अंतर्गत भारतीय नौदलातील हे दुसरे विशाखापट्टणम श्रेणीचे विनाशक आहे.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुंबई येथे संमारंभात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आयएनएस मुरगाव भारतीय नौदलाला समर्पित केले होते. भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने ही युद्धनौका तयार केली आहे. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची ताकद अनेक पटींनी वाढली आहे.
मुरगाव हे गोवा मुक्ती संघर्षाचे महत्त्वाचे केंद्र होते. याच कारणामुळे नव्या विनाशिकेला मुरगाव हे नाव देऊन नौदलाच्या माध्यमातूम गोव्यात लोकशाहीसाठी झालेल्या लढ्याला सलामी देण्यात आली आहे.
आयएनएस मुरगावची लांबी 163 मीटर आणि रुंदी 17 मीटर आहे. युद्धनौकेचे वजन सुमारे 7400 टन आहे. आयएनएस मुरगाव नौदलातील सर्वात शक्तिशाली विनाशक आहे. हे 30 नॉट्सच्या जास्त वेगाने देखील कार्य करू शकते.
INS मुरगाव ब्रह्मोस आणि बराक-8 सारख्या क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. हे इस्रायलच्या MF-STAR रडारने सुसज्ज आहे, जे हवेतील लांब पल्ल्याचे लक्ष्य देखील सहज शोधू शकते. 127 मिमीच्या तोफेने सुसज्ज असलेली INS मुरगाव 300 किमी अंतरावरूनही लक्ष्य वेधण्यात सक्षम आहे. यात AK-630 क्षेपणास्त्रविरोधी तोफा प्रणाली बसवण्यात आली आहे. याशिवाय, हे अँटी-सबमरीन रॉकेट लाँचरने सुसज्ज आहे.
ही युद्धनौका आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्ध लढण्यास सक्षम आहे. भारतीय नौदलाकडे असे चार 'विशाखापट्टणम' वर्गाचे विनाशक आहेत. 'मुरगाव' हे जहाज P15 ब्रुअर वर्गातील दुसरे जहाज आहे. जहाज सर्व शस्त्रे आणि सेन्सर्सने पूर्णपणे सज्ज आहे आणि कोणत्याही प्रकारच्या ऑपरेशनल तैनातीसाठी सज्ज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.