Indonesia Retirement Home Fire: Dainik Gomantak
ग्लोबल

रात्रीच्या अंधारात आगीच्या ज्वाळा आणि किंकाळ्या... वृद्धाश्रमाला लागलेल्या आगीत 16 ज्येष्ठांचा होरपळून दुर्देवी मृत्यू; रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु Watch Video

Indonesia Retirement Home Fire: इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी प्रांतातील मानाडो शहरातून एक अत्यंत वेदनादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली.

Manish Jadhav

Indonesia Retirement Home Fire: इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी प्रांतातील मानाडो शहरातून एक अत्यंत वेदनादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली. रविवारी (28 डिसेंबर) संध्याकाळी येथील एका 'रिटायरमेंट होम'ला भीषण आग लागल्याने 16 वृद्धांचा मृत्यू झाला. ही आग इतकी भीषण होती की, निवारा केंद्रात राहणाऱ्या वयोवृद्धांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी बहुतेक रहिवासी गाढ झोपेत होते, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

रात्रीचा थरार

उत्तर सुलावेसी पोलीस प्रवक्ते अलमस्याह हसिबुआन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानाडो येथील हे निवारा केंद्र एक मजली होते. रविवारी संध्याकाळी अचानक या केंद्रातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, काही क्षणातच संपूर्ण इमारतीला आगीने वेढले. या दुर्घटनेत एकूण 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 15 जणांचा मृतदेह आगीत पूर्णपणे जळून खाक झाला. आश्चर्याची बाब म्हणजे एका वृद्धाचा मृतदेह मात्र पूर्णपणे सुरक्षित स्थितीत सापडला आहे, परंतु गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बचावकार्य आणि प्रत्यक्षदर्शींचा अनुभव

आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि तातडीने आपत्कालीन सेवांना पाचारण केले. अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन तासांहून अधिक काळ संघर्ष करावा लागला. इंडोनेशियातील स्थानिक टीव्ही चॅनेलवर प्रसारित झालेल्या दृश्यांमध्ये आगीचे लोट दिसत आहेत. चहूबाजूंनी ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येत होता. या आगीतून 15 जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी मानाडोमधील दोन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले असून यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची मदत घेतली जात आहे.

आगीचे कारण आणि चौकशीचे आदेश

प्राथमिक तपासात ही आग 'इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट'मुळे लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, पोलीस प्रशासनाने अधिकृतरित्या सांगितले की, आगीचे (Fire) नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. निवारा केंद्राबाहेर ठेवलेले 'बॉडी बॅग्स'चे ढीग या घटनेची भीषणता स्पष्ट करत होते. आजूबाजूच्या रहिवाशांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे काही लोकांचे प्राण वाचू शकले, अन्यथा ही दुर्घटना अधिक मोठी होऊ शकली असती. या घटनेने संपूर्ण इंडोनेशियात हळहळ व्यक्त केली जात असून वृद्धाश्रमांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ishan Kishan: "मी पुन्हा तशीच फलंदाजी करू शकतो की नाही"? ईशान किशनने उलगडले रहस्य; म्हणाला, 'मी स्वतःलाच....'

Deltin Casino: डेल्‍टीन कॅसिनोचा मार्ग होणार मोकळा! धारगळसह इतर गावांतील 36 हेक्‍टर जमीन ‘काडा’तून वगळणार

Goa ST Commissioner: 7 महिन्यांपासून ‘एसटी आयुक्त’चे पद रिक्‍त! 213 दावे प्रलंबित; नियुक्‍तीची शिफारस करणारी फाईल सरकारकडे

Panaji Riverfront: पणजीसाठी नवे ‘रिव्हरफ्रंट’! मांडवी काठावर शहरातील निसर्गरम्य खुले स्थळ

Goa Police: पोलिसांत अधीक्षकांची ‘भाऊगर्दी’! मंजूर पदांपेक्षा वाढल्या बढत्या; अतिरिक्त कार्यभार कमी करण्याचे कारण पुढे

SCROLL FOR NEXT