Football Dainik Gomantak
ग्लोबल

Indonesia त फुटबॉल मैदानावर मृत्यूचा नंगा नाच, हिंसाचारात 127 ठार; अनेकजण जखमी

Football Match Violence: इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात 127 जणांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक

Indonesia Football Match Violence: इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात 127 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 160 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका संघाने सामना गमावल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला.

दरम्यान, एएफपी वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पूर्व जावा येथील सामन्यानंतर संतप्त चाहत्यांनी फुटबॉल मैदानावर हल्ला केला. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. एएफपी वृत्तसंस्थेने पूर्व जावाचे पोलीस प्रमुख निको आफिंटाच्या हवाल्याने सांगितले की, स्टेडियममध्ये 34 लोकांचा मृत्यू झाला आणि बाकीचे रुग्णालयात मरण पावले.

फुटबॉल सामन्यात हिंसाचार का झाला?

इंडोनेशियामध्ये (Indonesia) पर्स्बाया सुराबायाने अरेमा एफसीकडून फुटबॉल सामना 3-2 ने असा जिंकला. त्यानंतर अरेमा एफसीचे हजारो चाहते मैदानात घुसले आणि हिंसाचार सुरु केला. यानंतर स्थानिक पोलीस (Police) आणि इंडोनेशियाच्या राष्ट्रीय सशस्त्र दलाचे कर्मचारीही मैदानात दाखल झाले आणि त्यांनी पर्स्बाया सुराबायाच्या खेळाडूंना संरक्षण दिले.

सुरक्षा कर्मचारी आणि चाहत्यांमध्ये चकमक झाली

मैदानात सुरक्षा दले (Security Forces) आणि चाहते यांच्यात चकमक झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. यादरम्यान चाहत्यांनी सुरक्षा जवानांवर वस्तू फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाला नियंत्रित करण्यासाठी सुरक्षा दलाकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला.

तसेच, पीटी लीगा इंडोनेशिया बारु (LIB) चे अध्यक्ष अखमद हादियान लुकिता यांनी इंडोनेशियातील या हिंसक घटनेवर सांगितले की, 'आम्ही या घटनेबद्दल खूप चिंतित आहोत आणि मनापासून खेद व्यक्त करतो. आणि आशा करतो की हा आपल्या सर्वांसाठी एक धडा असेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT