गेल्या एक वर्षापासून चीन सोबतचे नाते चिंताजनक झाले आहे. अशी माहिती परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिली आहे. Dainik Gomantak
ग्लोबल

भारत-चीन संबंधांचा पाया खराब झालाय : परराष्ट्रमंत्र्यांची माहिती

गेल्या 40 वर्षांपासून बीजिंगशी आमचे अतिशय चांगले संबंध होते. परंतु गेल्या एक वर्षापासून चीन सोबतचे नाते चिंताजनक झाले आहे. भारत-चीन यांच्यात झालेल्या कराराचे चीनने आकलन करणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: भारत-चीन संबंधांचा (Indo-China relations) पाया खराब (Bad foundation) झाला असून, दोघांमध्ये झालेल्या कराराचे बीजिंगकडून पालन केले जात नाही. अशी माहिती परराष्ट्रमंत्री जयशंकर (Foreign Minister Jaishankar) यांनी दिली आहे.

जयशंकर म्हणाले, गेल्या 40 वर्षांपासून बीजिंगशी आमचे अतिशय चांगले संबंध होते. परंतु गेल्या एक वर्षापासून चीन सोबतचे नाते चिंताजनक झाले आहे. भारत-चीन यांच्यात झालेल्या कराराचे चीनने आकलन करणे गरजेचे आहे. चीन दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे. मॉस्कोतील प्राइमाकोव्ह इंस्टिट्यूट ऑफ वर्ल्ड इकोनॉमी अँड इंटरनॅशनल रिलेशनशिप या विषयावर भारत-चीन संबंधाबाबत उत्तर देताना जयशंकर बोलत होते.

दोन देशातील अणवस्त्रांच्या स्पर्धेच्या बाबात ते म्हणाले, चिनी अणुप्रक्रियेत भारतापेक्षा गतिमान आहे. भारत-चीन यांच्यात अण्वस्त्रांची शर्यत नाही. चीन हा 1964 मध्ये अणुशक्ती देश बनला तर भारत 1998 मध्ये अणुवस्त्रधारी बनला आहे.

दुसऱ्या महायुध्दानंतर भारत आणि रशिया यांच्यात चांगले संबंध निर्माण झाले आहेत. अमेरिका, युरोप, चीन, जपान, तुर्की किंवा इराण यांच्यातील संबंधात रशियाचे चढ-उतार आले असतील पण भारताच्या फारसे तसे झाले नाही. काही मुद्द्यांमध्ये बदल झाले असतील पण संबंध अद्याप चांगलेच आहेत.

जयशंकर यांनी तेहरान ते मॉस्कोमार्गे जाणाऱ्या प्रवासात इराणी नेतृत्त्वाशी अफगाणिस्तानच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. या दोन देशांतील नेत्यांनी रिजनल आणि ग्लोबल परिस्थिती विषयी चर्चा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT