Sweden Mall Dainik Gomantak
ग्लोबल

Sweden Mall: स्वीडनच्या शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, 1 ठार

स्वीडनमधील एका शॉपिंग सेंटरमध्ये झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या बातम्या अनेकदा अमेरिकेतून समोर येत असतात. पण यावेळी ही गोळीबाराची बातमी स्वीडनमधून आली आहे. स्वीडनमधील (Sweden) एका शॉपिंग सेंटरमध्ये झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. (Indiscriminate shooting at a Sweden mall one dead)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात जखमी झालेली एक महिला रुग्णालयात असून तिच्यावर अध्याप उपचार सुरू आहेत. दक्षिणेकडील मालमो शहरात घडलेल्या घटनेतील संशयित शूटरला पोलिसांनी अटकेत घेतले आहे.

एएफपीच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी या घटनेशी दहशतवादी संबंधास नकार दिला आहे. स्थानिक मीडियाने प्रत्यक्षदर्शींचा हवाला देत सांगितले की, संशयिताने जमावावर अंदाधुंद गोळीबार केला, परंतु पोलिसांनी याला दुजोरा दिला नाहीये.

जुलैमध्ये, डॅनिश राजधानी कोपनहेगनमधील एका शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता, जो मालमोपासून 30 किमी अंतरावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa TET 2025: सुवर्णसंधी! शिक्षक होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, गोवा 'टीईटी'चे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Ola Electric Sales Goa: ओला कंपनीला मोठा झटका; गोव्यात इलेक्ट्रिक बाईकची विक्री थांबवली

Mohammad Azharuddin: क्रिकेटचा कॅप्टन आता राज्याचा मंत्री! मोहम्मद अझरुद्दीन यांची तेलंगणा मंत्रिमंडळात नवी इनिंग

Pratapgad Fort : 1656 मध्ये जावळी जिंकले, शिवरायांनी किल्ला बांधण्याची आज्ञा दिली; पराक्रमाची गाथा सांगणारा 'प्रतापगड'

Womens World Cup 2025 Final : टीम इंडिया की आफ्रिका? अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? काय सांगतो आयसीसीचा नियम? वाचा

SCROLL FOR NEXT