Ajay Banga Dainik Gomantak
ग्लोबल

New President of the World Bank: जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंगा यांची वर्णी, 2 जून रोजी स्वीकारणार पदभार

भारतीय वंशाचे अजय बंगा हे जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष असतील. बुधवारी अजय बंगा यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची पुष्टी जागतिक बँकेने केली आहे.

Manish Jadhav

Ajay Banga appointed as the President of the World Bank: भारतीय वंशाचे अजय बंगा हे जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष असतील. बुधवारी अजय बंगा यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची पुष्टी जागतिक बँकेने केली आहे. "जागतिक बँक समूह बंगा यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे."

बँकेने बंगा यांच्या नेतृत्वाला पाच वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता देण्याच्या मतानंतर लगेचच प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटले की, ते ही नवी जबाबदारी स्वीकारतील.

(Indian-American Business Leader Ajay Banga appointed as the President of the World Bank)

दरम्यान, मास्टरकार्ड इंक.च्या माजी सीईओला गेल्या महिन्यात अध्यक्ष जो बायडन यांच्याकडून मान्यता मिळाली.

जागतिक बँकेचे (World Bank) विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी जवळपास वर्षभरापूर्वी पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांच्या उमेदवारीला भारताने पाठिंबा दिला.

जन्म पुण्यात, शिमल्यातून शिक्षण घेतले

जागतिक बँकेचे अध्यक्ष आणि मास्टरकार्डचे माजी सीईओ अजय बंगा यांचा शिमल्याशी जवळचा संबंध आहेत. पुण्यात (Pune) जन्मलेल्या बंगा यांनी 70 च्या दशकात शिमल्यातील सेंट एडवर्ड स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होते.

यादरम्यान ते काही काळ शिमल्यात तैनात होते. यादरम्यान अजय बंगा यांना सेंट एडवर्ड स्कूल शिमला येथे दाखल करण्यात आले.

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी बंगा यांची निवड झाल्याने ही केवळ सेंट एडवर्ड स्कूलसाठीच नव्हे तर शिमला आणि हिमाचलसाठीही अभिमानाची बाब आहे.

जागतिक अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अजय बंगा यांना मोठा पाठिंबा मिळाला

63 वर्षीय अजय बंगा यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून नामांकन दिले होते. समर्थनाच्या एका खुल्या पत्रात, 55 वकील, शिक्षणतज्ज्ञ, अधिकारी, दिग्गज आणि माजी सरकारी अधिकारी यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामांकनाला पाठिंबा दिला.

बंगा यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये अनेक नोबेल विजेतेही होते. यामध्ये डॉ. जोसेफ स्टिग्लिट्झ (2001 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले), डॉ. मायकेल स्पेन्स (2001 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते) आणि प्राध्यापक मुहम्मद युनूस (2006 चे नोबेल शांतता पुरस्कार विजेते) यांच्या नावांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT