Indian Consulate in San Francisco 
ग्लोबल

खलिस्तानी समर्थकांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासाला लावली आग, FBI करणार तपास; Video

अमेरिकेकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Khalistan supporters attempted vandalism and arson against Indian Consulate in San Francisco

खलिस्तानी समर्थकांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासाला आग लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. अमेरिकेकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. शिख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने 08 जुलैपासून परदेशातील भारतीय दूतावासाला घेरण्याची घोषणा केली.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी (02 जुलै) रात्री उशिरा ही घटना समोर आली आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) या प्रकरणाचा तपास करत आहे.

अमेरिकन चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार, खलिस्तानी कट्टरवाद्यांनी पहाटे दीड ते अडीचच्या दरम्यान भारतीय दूतावासाला आग लावली. पण सॅन फ्रान्सिस्को अग्निशमन विभागाने तातडीने आग विझवली.

दरम्यान याघटनेत अधिक नुकसान झाले नसून, कोणी कामगार देखील जखमी झाले नाही. खलिस्तान समर्थकांनी या घटनेचा व्हिडिओ जारी केला आहे. मात्र, या व्हिडिओच्या सत्यतेची अद्याप पुष्टी झालेली नाही.

यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी या प्रकरणाबद्दल ट्विट केले आहे. “शनिवारी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात कथितपणे तोडफोड आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अमेरिका या घटनेचा तीव्र निषेध करते. युनायटेड स्टेट्समधील राजनैतिक सुविधा किंवा परदेशी मुत्सद्दी यांच्या विरुद्ध तोडफोड किंवा हिंसाचार हा गुन्हा आहे." असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मार्चमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तान समर्थकांच्या एका गटाने हल्ला केल्यानंतर ही दुसरी घटना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT