Indian Ship Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Indian Ship Attack: अरबी समुद्रात भारतीय जहाजावर भीषण हल्ला! 13 भारतीयांची सुटका, 1 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालय आक्रमक

Indian Ship Attack Oman Coast: अरबी समुद्रात पुन्हा एकदा भारतीय व्यापारी जहाजाला लक्ष्य करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली.

Manish Jadhav

Indian Ship Attack Oman Coast: अरबी समुद्रात पुन्हा एकदा भारतीय व्यापारी जहाजाला लक्ष्य करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली. ओमानच्या किनारपट्टीजवळ 'एमटी अल गया' (MT El Gaia) या भारतीय कमर्शियल शिपवर भीषण हल्ला झाला. हल्ल्याच्या वेळी या जहाजावर एकूण 14 भारतीय कर्मचार्‍यांचा ताफा उपस्थित होता. ओमानच्या स्थानिक प्रशासनाने आणि बचाव पथकांनी तातडीने मोहीम राबवून 13 भारतीय कर्मचार्‍यांना सुरक्षितपणे बाहेर काढले, मात्र एक भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता असून त्याच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे.

या गंभीर घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अत्यंत कठोर शब्दांत संताप व्यक्त केला. पश्चिम आशियातील वाढता तणाव तातडीने कमी करण्याचे आवाहन करत भारताने व्यापारी जहाजे, नाविक आणि नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ले कधीही खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा दिला. ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून बचावकार्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधत आहे. भारताने संकटसमयी तातडीने मदत केल्याबद्दल ओमान प्रशासनाचे आभार मानले, तसेच आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर सुरक्षित वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी केली.

विशेष म्हणजे, हा हल्ला नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर घडला. परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी सुरक्षेचा आणि जागतिक व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नाविकांच्या रक्षणाचा मुद्दा अत्यंत गांभीर्याने मांडला. सागरी संकटाच्या काळात मदत पुरवण्यासाठी 'नाविक इमर्जन्सी सपोर्ट नेटवर्क' स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला. आकडेवारीनुसार, अमेरिका-इराण (Iran) तणाव सुरु झाल्यापासून या भागात मारल्या गेलेल्या 16 नाविकांपैकी 10 भारतीय नाविक आहेत.

दरम्यान, मध्य पूर्वेतील या भीषण तणावाच्या काळात एक सकारात्मक बातमी समोर आली. इराण आणि ओमान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या नवीन सागरी मार्गांवर सहमत झाले आहेत. असे असले तरी, वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे भारतीय नाविक आणि जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

SCROLL FOR NEXT