Operation Sindoor Dainik Gomantak
ग्लोबल

Lashkar-e-Taiba Video: कोसळलेल्या मशीदीचे तुकडे दाखवले, 'ऑपरेशन सिंदूर'च्या कारवाईचा पुरावा आता लष्कर-ए-तोयबाने दिला

७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये रात्रीच्या वेळी भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा (LET) मुरीदके तळ उद्ध्वस्त करण्यात आला.

Sameer Amunekar

७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये रात्रीच्या वेळी भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा (LET) मुरीदके तळ उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. आता या कारवाईबाबत लष्करच्या दहशतवाद्यांनीच कबुलीजबाब दिला असून पाकिस्तान सरकारचे दावे उघडे पडले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर कासिमने कबूल केले की मुरीदके येथील मरकझ तैयबा हे मुख्यालय भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले होते.

“मी मरकझ तैयबाच्या अवशेषांवर उभा आहे. ही मशीद पूर्वीपेक्षा मोठी बांधली जाईल,” असे कासिम व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतो. त्याने पुढे स्पष्ट केले की या तळावर अनेक मुजाहिदीन व तलाबा (विद्यार्थी) यांना जिहादी प्रशिक्षण देण्यात आले होते.

दरम्यान, पाकिस्तानने मात्र अधिकृतरीत्या असा दावा केला होता की उद्ध्वस्त इमारत आता दहशतवादी गट वापरत नाही. पण, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये लष्करचा कार्यकर्ता पाकिस्तानी तरुणांना मुरीदके येथील ‘दौरा-ए-सुफ्फा’ या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करताना पाहायला मिळतोय.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने केवळ मुरीदकेच नव्हे तर बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे तळ, सियालकोटमधील हिजबुल मुजाहिदीनचे तळ तसेच बर्नाला आणि मुझफ्फराबादमधील लष्करचे तळ उद्ध्वस्त केले होते. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २६ नागरिकांची हत्या झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

याच वेळी, आणखी एका व्हिडिओमध्ये लष्करचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी याने पाकिस्तान सरकार व लष्कराकडून थेट आर्थिक मदत मिळत असल्याचा दावा केला आहे. “मुरीदके मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी सरकारकडून निधी पुरवण्यात आला,” असे त्याने सांगितले.

याआधी जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद इलियास काश्मिरी यानेही ऑपरेशन सिंदूरमध्ये बहावलपूरवरील हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाल्याचे कबूल केले होते. त्याचबरोबर पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या आदेशाने जनरल्सनी मृत दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावल्याचाही खुलासा त्याने केला होता.

या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तानचे अधिकृत दावे पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात आले असून भारतीय सैन्याच्या हल्ल्यांमुळे दहशतवादी संघटनांची कंबर मोडल्याचे वास्तव आता स्वतः दहशतवादीच कबूल करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...तर सोमवारी गोवा बंद! आंदोलकांचा सरकारला अल्टीमेटम, मास्टरमाईंड शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान

Panjim Protest: 'नेपाळी गोव्यात येऊन धंदा करतोय...', आंदोलकांनी Swiggyच्या 'डिलिव्हरी बॉय'ला घेरत सरकारवर साधला निशाणा

Viral Video: पाणीपुरीसाठी महिलेचा राडा! भररस्त्यात बसून अडवली वाहतूक, म्हणते, 'मला दोन पाणीपुरी खाऊ घाला, नाहीतर...'

Goa Live Updates: मडगाव रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक पोलिसांचा 'नो पार्किंग'मधील वाहनांवर कारवाईचा बडगा

Old Goa Accident: अपघातांची मालिका काही थांबेना, ओल्ड गोव्यात कार-दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT