Indus Water Treaty Dainik Gomantak
ग्लोबल

Indus Water Treaty: "पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही!", सिंधू जल करारावर भारताचा पाकिस्तानला थेट इशारा; आंतरराष्ट्रीय लवादात धाव घेऊनही फायदा नाही

India Warning To Pakistan On Indus Water: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अत्यंत आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली.

Manish Jadhav

India Warning To Pakistan On Indus Water: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अत्यंत आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानसोबतचा ऐतिहासिक सिंधू जल करार स्थगित केला. पाकिस्तानच्या दिशेने जाणारे नदीचे पाणी रोखले. भारताच्या या धोरणात्मक निर्णयामुळे पाकिस्तानात पाण्याचे भीषण संकट उभे राहिले.

पाकिस्तानातील (Pakistan) अनेक गावे आणि शेती पाण्याविना सुकली असून तेथील जनता तहानलेली आहे. या परिस्थितीनंतर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला पीडित दाखवत 'व्हिक्टिम कार्ड' खेळण्याचा आणि अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताने आपली भूमिका ठाम ठेवली.

सूत्रानुसार, भारताने पाकिस्तानला थेट शब्दांत इशारा दिला की सिंधू जल करार आता पूर्वस्थितीत लागू होणे अशक्यप्राय आहे. पाकिस्तानने पाणीटंचाई दूर करण्यासाठी दोन मुख्य अटी पूर्ण कराव्यात. पहिली अट म्हणजे पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग आणि दहशतवाद्यांची साथ पूर्णपणे सोडली पाहिजे आणि दुसरी म्हणजे आपल्या जमिनीवरुन चालणाऱ्या दहशतवादी नेटवर्कवर ठोस कारवाई केली पाहिजे. पाकिस्तानात खुलेआम फिरणारे दहशतवादी हे तिथल्या प्रशासनाच्या पाठिंब्यामुळेच मोकाट आहेत.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात किंवा लवाद मध्यस्थांकडे जाऊन पाकिस्तानला कोणतीही मदत मिळणार नाही, कारण त्यांनी स्वतःच्या चुकीच्या धोरणांचे फळ भोगले पाहिजे. जर त्यांना पाण्याची एवढी गरज होती, तर त्यांनी पाणी साठवण्यासाठी योग्य यंत्रणा का उभारली नाही, असा सवालही भारताने उपस्थित केला.

1960मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान दरम्यान सिंधू जल करार झाला. या करारानुसार पूर्वेकडील रावी, बियास आणि सतलज नद्यांचे पाणी भारताला तर पश्चिमेकडील सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले. तसेच पश्चिमेकडील नद्यांवर भारताला विशिष्ट प्रकल्पांची परवानगी आहे. मात्र पाकिस्तानने नेहमीच या करारातील तरतुदींचा भंग करत भारताच्या जलप्रकल्पांना विरोध दर्शवला. आता भारताने आपली रणनीती बदलली असून दहशतवादाचा नायनाट झाल्याशिवाय पाकिस्तानला एक थेंबही पाणी न देण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT