India Population Dainik Gomantak
ग्लोबल

India Population Report: चीनला मागे टाकून भारत बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश

India Population Report: भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश चीन नसून भारत आहे.

Manish Jadhav

India Population Report: भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश चीन नसून भारत आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात भारताने चीनला मागे टाकले आहे. भारताची लोकसंख्या एका वर्षात 1.56 टक्क्यांनी वाढली आहे.

भारताची लोकसंख्या 142.86 कोटी झाली आहे तर चीनची लोकसंख्या 142.57 कोटी झाली आहे. भारतात आता चीनपेक्षा दोन दशलक्ष अधिक लोकसंख्या आहे.

भारत हा तरुणांचा देश

या अहवालात भारताचा एकूण प्रजनन दर 2.0 असल्याचे सांगण्यात आले. येथे भारतीय पुरुषाचे सरासरी आयुष्य 71 वर्षे आहे, तर महिलांचे 74 वर्षे आहे.

हा अहवाल 1978 पासून प्रसिद्ध होत आहे. UNFPA भारताच्या प्रतिनिधीने सांगितले की, आता जगाची लोकसंख्या 8 अब्जांवर पोहोचली आहे.

UNFPA अहवालात असे नमूद केले आहे की, भारतातील (India) 25% लोकसंख्या 0-14 वयोगटातील, 18% 10-19 वयोगटातील, 26% 10-24 वयोगटातील, 15-64 वर्षे वयोगटातील लोक आहेत. 68% आणि 65 वरील लोक 7% आहेत.

चीनने लोकसंख्या कायदा शिथिल केला

चीनची लोकसंख्या वृद्ध होत आहे. यामुळे चीन त्रस्त आहे. चीन (China) सरकारने अनेक सवलती दिल्या आहेत. जी जोडपी 2 किंवा 2 पेक्षा जास्त मुलांना जन्म देतील, त्यांना अनेक सुविधा देण्यात येतील.

तरुण मुला-मुलींनी प्रेमात पडण्यासाठी आणि स्थायिक होण्यासाठी आणि मूल होण्यासाठी किमान 15 दिवस 'स्प्रिंग ब्रेक'वर जावे, असे अनेक महाविद्यालयांनी जाहीर केले आहे.

तसेच, चीनमधील सुमारे 40 टक्के लोकसंख्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. इथे एकेकाळी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम बनवले गेले. त्याचवर्षी, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या बीजिंगची लोकसंख्या कमी होत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT