India-Philippines  Dainik Gomantak
ग्लोबल

BrahMos: फिलीपाईन्स भारताकडून करतोय ब्रह्मोस क्षेपणास्त्राची खरेदी

ब्रह्मोस सुपरसोनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्राच्या विक्रीसाठी भारत आणि फिलीपाईन्सने (Philippines) शुक्रवारी $374.96 दशलक्ष करारावर स्वाक्षरी केली.

दैनिक गोमन्तक

ब्रह्मोस सुपरसोनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्राच्या विक्रीसाठी भारत आणि फिलीपाईन्सने शुक्रवारी $374.96 दशलक्ष करारावर स्वाक्षरी केली. ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड या क्षेपणास्त्र निर्माता कंपनीसोबत हा करार करण्यात आला आहे. फिलीपाईन्सने (Philippines) आपल्या नौदलासाठी भारताकडून (India) ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करत आहे. या विशेष प्रसंगी फिलीपिन्सचे सर्वोच्च संरक्षण अधिकारी उपस्थित होते, तर भारताचे प्रतिनिधीत्व त्यांच्या राजदूताने केले होते. फिलिपाइन्स आपल्या किनाऱ्यावर तैनात केल्या जाणाऱ्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी ही खरेदी करत आहे. (India Philippines Sign Deal To Sell BrahMos Supersonic Anti Ship Cruise Missiles)

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून जलक्षेत्रावरुन चीनसोबतचा (China) तणाव खूप वाढला आहे. फिलीपाईन्स स्वतःचा दावा करत असलेल्या समुद्री क्षेत्रावर चिनी जहाजे अनेक महिन्यांपासून तळ ठोकून आहेत. फिलीपाईन्सचे सर्व प्रयत्न करुनही झाले चीन मात्र काही ऐकायला तयार नाही. अशा परिस्थितीत भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र घेऊन ते आपले नौदल अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा असा करार आहे, जो दक्षिण चीन समुद्रात भव्यता दाखवणाऱ्या चीनला निश्चितच झटका देईल. ब्रह्मोस (BrahMos) हे असे क्षेपणास्त्र आहे, ज्यापासून चीनसारखा देशही घाबरतो.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची शक्ती किती आहे?

ब्रह्मोस सुपरसोनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्र 350 ते 400 किमीपर्यंत मारा करु शकते. अर्थात एवढ्या अंतरावर उभ्या असलेल्या शत्रूचे सर्व काम याने करता येते. हे क्षेपणास्त्र मॅक 2.8 म्हणजेच आवाजाच्या तीन पट वेगाने डागता येते. अलीकडेच त्याची नवीन आवृत्तीचीही चाचणी घेण्यात आली. 20 जानेवारी रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर घेण्यात आलेली ही चाचणी यशस्वी झाली. तांत्रिकदृष्ट्या, हे क्षेपणास्त्र नवीन अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. ब्रह्मोसचे वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीवर असलेल्या पाणबुडी, युद्धनौका, विमानातून कोठूनही प्रक्षेपित केले जाऊ शकते.

ब्रह्मोस म्हणजे काय?

ब्रह्म म्हणजे 'ब्रह्मपुत्रा' ब्रह्मोस, तर मॉस म्हणजे 'मोस्क्वा' (ब्रह्मोसचा अर्थ). मॉस्क्वा हे रशियात वाहणाऱ्या नदीचे नाव आहे. या क्षेपणास्त्राची 21 व्या शतकातील सर्वात प्राणघातक आणि धोकादायक क्षेपणास्त्रांमध्ये गणना केली जाते. हे शत्रूच्या रडारपासून सहज सुटू शकते. या क्षेपणास्त्राच्या अचूकतेमुळे ते इतर शस्त्रांपेक्षा वेगळे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT