Sri Lanka Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: हिंसक आंदोलकांवर पहिल्यांदाच गोळीबार; 1 ठार, 10 जण जखमी

श्रीलंकेतील (Sri Lanka) आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधी निदर्शने तीव्र झाली आहेत.

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधी निदर्शने तीव्र झाली आहेत. मंगळवारी पहिल्यांदाच पोलिसांनी हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार केला. यामध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी आहेत. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी त्यांनी गोळीबार केल्याची पुष्टी पोलिस प्रवक्त्याने केली. वृत्तानुसार, मध्य श्रीलंकेतील (Sri Lanka) रामबुक्कानामध्ये निदर्शकांनी महामार्ग रोखला. हे ठिकाण कोलंबोपासून 95 किमी अंतरावर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) वाढत्या किमतींमुळे लोक निषेध करत आहेत.

दरम्यान, इंधनाच्या तीव्र टंचाईमुळे संपूर्ण श्रीलंकेत लोक निषेध करत आहेत. हजारो वाहनधारकांनी जाळपोळ करत प्रमुख रस्ते रोखले आहेत. श्रीलंका सध्या अन्न, औषधे आणि इंधनाच्या संकटाशी झुंजत आहे. 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंकेवर आलेले हे सर्वात मोठे आर्थिक संकट आहे. या संकटामुळे लोक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

याशिवाय, श्रीलंकेला अन्न आणि इंधनाच्या तुटवड्यामुळे गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ज्याचा परिणाम श्रीलंकन जनेतवर होत आहे. तर कोरोना संकटामुळे आधीच देशातील व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. परिणामी, श्रीलंकेला परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे, संयोगाने, जीवनावश्यक वस्तू आणि इंधन आयात करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला, ज्यामुळे देशात दीर्घकाळ वीज कपात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

Bull Fight Viral Video: रस्त्यावर जनावरांचा थरार अन्...! बैलाची स्कूटीला जोरदार धडक; अंगावर काटा आणणार व्हिडिओ तूफान व्हायरल

Goa RGP: 'गोमंतकीयांचे हित जपणारे सरकार हवे'; बोरकरांचा निर्धार! 'आरजी'च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

SCROLL FOR NEXT