Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान खान सरकार भारतापुढे झुकण्यास तयार!

पाकिस्तानच्या गगनाला भिडणाऱ्या महागाईने भारताकडून आयात निर्बंधांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानच्या गगनाला भिडणाऱ्या महागाईने भारताकडून आयात निर्बंधांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे वाणिज्य आणि गुंतवणुकीचे सल्लागार अब्दुल रझाक दाऊद म्हणाले की, भारतासोबत (India) व्यापार करणे ही काळाची गरज आहे आणि ते भारतापेक्षा पाकिस्तानसाठी अधिक फायदेशीर आहे. (Pakistan and India Latest News Update)

पाकिस्तानी वृत्तपत्र वृत्तानुसार, रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अब्दुल रझाक दाऊद म्हणाले, 'ज्यापर्यंत वाणिज्य मंत्रालयाचा संबंध आहे, तो अशा स्थितीत आहे की भारतासोबत व्यापार व्हावा. आणि माझी भूमिका अशी आहे की आपण भारतासोबत व्यापार केला पाहिजे. दोन्ही देशांमधील व्यापार पुन्हा सुरू झाला पाहिजे.

अब्दुल रझाक दाऊद म्हणाले की, ते भारतासोबतच्या व्यापाराचे समर्थन करतात कारण ते पाकिस्तानसाठी खूप फायदेशीर आहे. ते म्हणाले, 'भारतासोबतचा व्यापार प्रत्येकासाठी, विशेषत: पाकिस्तानसाठी खूप फायदेशीर आहे. आणि मी त्याचे समर्थन करतो.'

पाकिस्तानातील गगनाला भिडणारी महागाई आणि त्याचा लोकांवर होणारा विपरीत परिणाम याबद्दल बोलताना ते म्हणाले, 'या मुद्द्यावर मी तुमच्याशी सहमत आहे. मात्र तेल, कच्चा माल, यंत्रसामग्री आणि इतर वस्तूंच्या आयातीमुळे ही समस्या कायम राहणार आहे. याआधीही पाकिस्तानने भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्याची चर्चा केली होती, मात्र विरोधकांच्या विरोधामुळे इम्रान सरकारला माघार घ्यावी लागली होती.

भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारावर बंदी का?

भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार 2019 पासून कमी होत आहे. त्याच वर्षी जानेवारी महिन्यात काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले होते. भारताने यासाठी पाकिस्तानला दोषी ठरवत पाकिस्तानसोबतच्या व्यापारावरील सीमाशुल्क 200 टक्क्यांनी वाढवले. याचा परिणाम असा झाला की काही महिन्यांतच भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार 10 टक्क्यांहून कमी झाला.

भारताने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले, ज्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने भारतातून आयातीवर बंदी घातली. यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार 90 टक्क्यांनी घसरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

SCROLL FOR NEXT