Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान खान यांनी रॅलीत प्ले केला एस जयशंकर यांचा Video, 'India कुणापुढे झुकत नाही'

Imran Khan Played S Jaishankar Video: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे तोंड भरुन कौतुक केले आहे.

दैनिक गोमन्तक

Imran Khan Played S Jaishankar Video: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे तोंड भरुन कौतुक केले आहे. वास्तविक, त्यांनी लाहोरमध्ये आयोजित रॅलीदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा व्हिडिओ प्ले केला आणि भारताची जोरदार प्रशंसा केली. रशियाकडून स्वस्त तेल खरेदीसाठी अमेरिकेच्या दबावापुढे ठाम राहिल्याबद्दल त्यांनी भारताचे कौतुक केले.

इम्रान खान म्हणाले की, 'पाकिस्तानसोबतच स्वातंत्र्य मिळालेला भारत जर आपल्या जनतेच्या गरजेनुसार परराष्ट्र धोरण बनवू शकतो, परंतु पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार कोणाच्या इशाऱ्यावर चालत आहे.' इम्रान यांनी बैठकीत सांगितले की, 'हा तो व्हिडिओ आहे, जो अनेक माध्यमांनी शेअर केला आहे.'

भारताने अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिले - इम्रान खान

रॅलीमध्ये इम्रान यांनी जनसमुदयाला व्हिडिओ दाखवला. इम्रान पुढे म्हणाले, 'अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल न घेण्याचे आदेश दिले होते, परंतु भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला कसे चोख प्रत्युत्तर दिले ते तुम्ही ऐका. या व्हिडिओमध्ये जयशंकर त्यांना सांगत आहेत की, तुम्ही कोण आहात? युरोप रशियाकडून गॅस खरेदी करत असून लोकांच्या गरजेनुसार आम्ही गॅस खरेदी करु. भारत (India) हा एक स्वतंत्र देश आहे.'

"मी या गुलामीच्या विरोधात आहे" - इम्रान खान

यासोबतच त्यांनी शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) सरकारवर रशियन तेल खरेदीसाठी अमेरिकेच्या (America) दबावापुढे झुकल्याची टीकाही केली. खान म्हणाले, "आम्ही रशियाशी (Russia) स्वस्त तेल खरेदी करण्याबाबत बोललो, परंतु, अमेरिकेच्या दबावाला नाही म्हणण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत, लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. मी या गुलामगिरीच्या विरोधात आहे''.

दुसरीकडे, एस जयशंकर (S Jaishankar) यांची ही व्हिडिओ क्लिप 3 जूनची आहे. जेव्हा भारताने रशियन तेल खरेदी करण्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते, "आम्ही कोणापुढेही न झुकता रशियाकडून गॅस खरेदी करत आहोत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT