Imran khan and Wife Bushra Bibi Jail Dainik Gomantak
ग्लोबल

Imran khan: इम्रान खानचे पाय आणखी खोलात; पत्नी बुशरा बीबीसह 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

Imran khan and Wife Bushra Bibi Jail: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (PTI) चे संस्थापक इम्रान खान यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.

Sameer Amunekar

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (PTI) चे संस्थापक इम्रान खान यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांखाली पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी या दोघांनाही प्रत्येकी १७-१७ वर्षांच्या कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे.

तोशाखाना-२ प्रकरणात मोठा दणका

शनिवारी रावळपिंडी येथील अडियाला जेलमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष न्यायाधीश शाहरुख अर्जुमंद यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. 'डॉन' या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (FIA) विशेष न्यायालयाने इम्रान खान आणि बुशरा बीबी यांना 'तोशाखाना-२' प्रकरणात दोषी ठरवले आहे.

हा खटला मे २०२१ मध्ये सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सने दिलेल्या महागड्या 'बुल्गारी' दागिन्यांच्या सेटशी संबंधित आहे. हे दागिने अधिकृत सरकारी भेटीत मिळाले होते, परंतु ते अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्याचा ठपका या दांपत्यावर ठेवण्यात आला आहे.

न्यायालयाने केवळ तुरुंगवासाची शिक्षाच दिली नाही, तर दोघांवर मिळून १६.४ दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा मोठा दंडही ठोठावला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना १० लाख रुपये आणि बुशरा बीबी यांना ५ लाख रुपयांचा स्वतंत्र दंड भरावा लागणार आहे. हा दंड न भरल्यास त्यांना अतिरिक्त काळ तुरुंगात राहावे लागेल.

यासोबतच न्यायालयाने त्यांची जमीन जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४०९ (फौजदारी विश्वासघात) आणि कलम ५(२)४७ (लोकसेवकांकडून गुन्हेगारी गैरवर्तन) अंतर्गत त्यांना ही कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे.

इम्रान खान आधीच तुरुंगात असून त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटण्यावरही प्रशासनाने बंदी घातली होती. आता पत्नीसह १७ वर्षांच्या शिक्षेमुळे त्यांच्या राजकीय भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अल-कादिर ट्रस्ट आणि १९० दशलक्ष पाउंडच्या फसवणुकीशी संबंधित या प्रकरणाने पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले आहे. या निकालामुळे पीटीआय समर्थकांमध्ये संतापाची लाट असून आगामी काळात पाकिस्तानमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

SCROLL FOR NEXT