Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan Leaking Confidential Documents: इमरान खान यांच्या अडचणीत वाढ; न्यायालय ठोठावणार मृत्यूदंड?

Imran Khan: न्यायालयाने तीन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

दैनिक गोमन्तक

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तोषखाना प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.

आता अमेरिकेच्या दूतावासाकडून त्यांना आणखी एक झटका मिळाला आहे. अमेरिकेच्या दूतावासातून गुप्त राजकीय दस्ताऐवज सार्वजनिक केलेल्या आरोपावरुन त्यांच्यावर आणखी एक गुन्हा नोंदवला गेला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इमरान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने तीन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) चे प्रमुख इमरान खान यांच्यावर सरकारी गुप्तता अधिनियम 1923, कलम 5 नुसार केस दाखल केली गेली आहे. कलम ५ नुसार जर इमरान खान यांचा गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना 14 वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते तर काही प्रकरणांमध्ये त्यांना मृत्यूची शिक्षादेखील सुनावली जाण्याची शक्यता आहे.

याआधी इमरान खान ( Imran Khan ) यांनी अमेरिकेवर गुप्त राजनैतिक दस्ताऐवजांचा वापर करुन आपले सरकार पाडल्याचा आरोप लावल्याचे संपूर्ण जगाने पाहिले आहे. मात्र अमेरिकेने हे आरोप फेटाळून लावल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेवरुन राजकीय नाट्य रंगल्याचे दिसून आले होते. इमरान खान यांच्या समर्थकांमनी त्यांच्या अटकेला जोरदार विरोध केला होता.

महत्वाचे म्हणजे, इमरान खान यांनी शहबाज शरीफ यांच्या सरकारवर आपल्याविरुद्ध कट केल्याचा आरोप केला होता. आता इमरान खान यांच्यावरील हे आरोप सिद्ध होणार का आणि आरोप सिद्ध झाले तर काय शिक्षा मिळणार हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दुकानातला QR कोड काढला आणि स्वतःचा लावला, महिला कर्मचाऱ्याने गंडवले मालकालाच; 49 लाख पळवले

Goa Assembly Election 2027: 'पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवणार'! उत्पल पर्रीकर यांनी केले जाहीर

'2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध, सुपर-8 मध्ये आफ्रिकेविरुद्ध भारत हारला तरी..', ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनने भारतीय संघाबाबत असे काही बोलला की..

VIDEO: गॅसतुटवडा प्रकरण पेटले, सिलिंडर पोचवणाऱ्या गाडीवर कुंकळ्ळीत हल्ला; दोघे गंभीर

IPL 2026: संजू सॅमसन घेणार 'धोनी'ची जागा? दिग्गज क्रिकेटपटूच्या वक्तव्यामुळे रंगली चर्चा; उपकर्णधारपदाचे वर्तवले भाकीत

SCROLL FOR NEXT