Taliban & Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

'इम्रान खान स्वतः एक कठपुतळी' तालिबानी नेत्याने पाकिस्तानला फटकारले

इम्रान खान (Imran Khan) स्वतः एक कठपुतळी आहेत, ज्यांना पाकिस्तानच्या लोकांनी निवडले नाही.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांना (Taliban) सरकार स्थापन करण्यासाठी पाकिस्तानने (Pakistan) मदत केली असल्याचे जगातील अनेक देश म्हणत आहेत. यातच आता तालिबान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काही अलबेल आहे असे काही दिसत नाही. याच पाश्वभूमीवर तालिबानच्या प्रवक्त्याने पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारत म्हटले की, इम्रान खान (Imran Khan) स्वतः एक कठपुतळी आहेत, ज्यांना पाकिस्तानच्या लोकांनी निवडले नाही. फ्रायडे टाइम्सच्या अहवालानुसार, तालिबानच्या प्रवक्त्याने पाकिस्तानला एका मुलाखतीदरम्यान अफगाणिस्तानच्या कामात हस्तक्षेप न करण्याची विनंती केली. तालिबानचे प्रवक्ते म्हणाले, "ज्याप्रमाणे आम्ही इतर कोणत्याही देशाच्या व्यवहारात हस्तक्षेप करत नाही, त्याचप्रमाणे इतर कोणत्याही देशाने आमच्या व्यवहारात हस्तक्षेप करु नये अशी आमची इच्छा आहे.''

याआधी बुधवारी इम्रान खान यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, कठपुतळी सरकारच्या मदतीने अफगाणिस्तान टिकू शकत नाही. यावर प्रतिक्रिया देताना तालिबानचे प्रवक्ते म्हणाले, "तुम्ही इम्रान खानबद्दल बोलत आहात की, त्यांना अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार हवे आहे. खुद्द पाकिस्तान गंभीर संकटात असून अनेक अडचणींना तोंड देत आहे. इम्रान स्वतः निवडून आलेला नाही. पाकिस्तानी लोकांच्या संमतीने ते पंतप्रधान झाले नाहीत.

“पाकिस्तानमधील लोक म्हणत आहेत की, सध्याचे सरकार हे पाकिस्तानी लष्कराचे कठपुतळी आहे. पाकिस्तानातील मोठ्या आणि लहान जातींच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे. पाकिस्तानातील सर्व जाती सध्याच्या सरकारवर खूश नाहीत. म्हणूनच ते त्याला सैन्याचे कठपुतळी सरकार म्हणतात आणि बऱ्याच अंशी ते बरोबर आहे, कारण ते वास्तव आहे.

आमच्या सरकारच्या व्यवस्थेबद्दल कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार नाही, असे प्रवक्त्याने सांगितले. तालिबान त्यांच्या सरकारच्या व्यवस्थेत कोणताही परदेशी हस्तक्षेप स्वीकारणार नाही. प्रत्येकाने आपल्या देशाकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपल्या लोकांना भेडसावत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काम केले पाहिजे. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानमध्ये अनेक समस्या आहेत, परंतु आम्ही त्याच्याबद्दल कधीही बोललो नाही किंवा या समस्यांसाठी आम्ही पाकिस्तानला कोणतीही सूचना दिली नाही, कारण आम्ही त्यांच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो. आम्हाला पाकिस्तानकडून समान आदर हवा आहे.

या मुलाखतीत प्रवक्त्याने अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला धमकीही दिली. "जे आमचा आदर करतात आणि त्यांना अफगाणिस्तानची भूमी त्यांच्या विरोधात वापरु नये असे वाटते, ते आमच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलणार नाहीत. परंतु ज्यांना आमच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करायचा काही एक अधिकारा नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fire Incident: गोव्यात सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी! हरमल किनाऱ्यावर शॉर्ट सर्किट; सुमारे 15 लाखांची मालमत्ता जळून खाक

MI vs DC: षटकारांच्या दुनियेत रोहित शर्माचा एकतर्फी दरारा! विराट-धोनीच्या 'एलिट' क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री; दिल्लीत रचला इतिहास

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गूड न्यूज; 8व्या वेतन आयोगाबाबत आली अपडेट

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

SCROLL FOR NEXT