Former Pakistan Prime Minister Imran Khan & Bushra Bibi Dainik Gomantak
ग्लोबल

Toshakhana Case: इम्रान खान आणि पत्नी बुशरा बीबी यांना मोठा दिलासा; तोशाखाना प्रकरणात 14 वर्षांच्या शिक्षेवर स्थगिती

Imran Khan & Bushra Bibi: इस्लामाबाद उच्च न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात इम्रान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना सुनावण्यात आलेली 14 वर्षांची शिक्षा स्थगित केली.

Manish Jadhav

Imran Khan & Bushra Bibi: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सोमवारी मोठा दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात इम्रान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना सुनावण्यात आलेली 14 वर्षांची शिक्षा स्थगित केली. देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी तोशाखानाप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप इम्रान खान यांच्यावर झाले होते. या संदर्भात न्यायालयाने 31 जानेवारी रोजी इम्रान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना प्रत्येकी 14-14 वर्षांची शिक्षा सुनावली होती. दोघांनीही या शिक्षेला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले, जिथे मुख्य न्यायाधीश आमिर फारुक यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.

दरम्यान, सोमवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणातील त्यांची शिक्षा स्थगित करुन आणि जामीन मंजूर करुन या जोडप्याला तात्पुरता दिलासा दिला. मात्र, पुढील महिन्यात ईदच्या सुटीनंतर शिक्षेविरोधातील त्यांच्या अपीलवर सुनावणी होईल, असे न्यायालयाने जाहीर केले. खान यांना इतर प्रकरणांमध्ये शिक्षा झाल्यामुळे त्यांची सुटका केली जाऊ शकत नाही. जोपर्यंत ते आरोपातून मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांना सोडता येणार नाही. त्याचप्रमाणे बुशरा बीबी यांना अन्य एका खटल्यात दोषी ठरवण्यात आले असून त्यांची शिक्षा स्थगित झाल्यानंतरही त्यांची सुटका होणार नाही.

महागड्या सरकारी भेटवस्तू स्वत:कडे ठेवल्याचा आरोप

तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात, 71 वर्षीय खान यांच्यावर आपल्या कार्यकाळात मिळालेल्या महागड्या सरकारी भेटवस्तू स्वत:कडे ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. तोशखाना नियमांनुसार, सरकारी अधिकारी त्या वस्तूची किंमत मोजून भेटवस्तू स्वत:कडे ठेवू शकतात, परंतु भेटवस्तू आधी तोशाखान्यात जमा करणे आवश्यक असते. सिफर प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर 30 जानेवारी रोजी खान यांना तोशाखाना प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते.

याआधी, इम्रान यांना ऑगस्ट 2023 मध्ये वेगळ्या तोशाखाना प्रकरणातही दोषी ठरवण्यात आले होते, ज्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. ताजी शिक्षा ही पंतप्रधान असताना त्यांना किंवा त्यांच्या जोडीदाराला मिळालेल्या भेटवस्तू ठेवण्याच्या अधिकाराचा गैरवापर केल्याच्या आरोपावर आधारित होती. नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने दाखल केला होता. खान यांना एप्रिल 2022 मध्ये सत्ता गेल्यापासून आतापर्यंत 4 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. तोशाखानाच्या दोन्ही प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुख-वैभवाचा 'राजयोग'! शुक्राच्या पॉवरफुल्ल गोचरमुळे 'या' 3 राशींना तगड फायदा, आता फक्त पैसा अन् पैसाच; गोल्डन पिरीयड सुरु

VIDEO: 10 रुपयांच्या अंड्याला लागली 'इतक्या' हजारांची बोली! इराणमधील युद्धग्रस्तांसाठी लडाखी जनतेचा मदतीचा हात; व्हिडिओ व्हायरल

Horoscope April 2026: 14 एप्रिलनंतर पालटणार 'या' राशीचं नशीब! गुरु आणि सूर्याच्या साथीमुळे कष्टाला मिळणार फळ; उत्पन्नाची दारे होणार खुली

US Israel Iran War: इस्रायल-अमेरिका हल्ल्यात इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू; युद्धविरामाच्या प्रस्तावादरम्यान संघर्षाचा भडका

US Iran War: इराणच्या वाळवंटात स्वतःचीच हाय-टेक विमाने बॉम्बने उडवली, अमेरिकेनं असं का केलं? 'त्या' रात्रीचा थरार व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT