Pakistan PM Shahbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: कर्जासाठी पाकिस्तान खोटं बोलला, IMF ने दिला मोठा दणका!

Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला यावेळी IMF ने मोठा दणका दिला आहे.

Manish Jadhav

Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला यावेळी IMF ने मोठा दणका दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व अटी पूर्ण केल्याचा पाकिस्तानचा दावा IMF ने फेटाळून लावला. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानने विविध देशांकडे आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

याशिवाय, पाकिस्तानला (Pakistan) आयएमएफकडूनही कर्ज मिळण्याची अपेक्षा होती, मात्र आयएमएफच्या या झटक्यानंतर परिस्थिती कठीण होण्याची खात्री आहे.

2019 मध्ये करार झाला

IMF ने 2019 मध्ये काही अटींवर पाकिस्तानला सहा अब्ज डॉलर्स देण्याचा करार केला होता. मात्र, ही योजना अनेकवेळा रुळावरुन घसरली असून अद्यापही पूर्ण रक्कम मिळालेली नाही.

त्यामागील कारण म्हणजे पाकिस्तानने सर्व अटींचे पालन करावे असे आयएमएफला वाटते. पंतप्रधान शहबाज शरीफ आणि अर्थमंत्री इशाक दार यांनी वारंवार दावा केला आहे की, पाकिस्तानने करारापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व अटी पूर्ण केल्या आहेत आणि करारातून मागे हटण्याचे कोणतेही कारण नाही.

दरम्यान, एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने म्हटले आहे की, त्यांना शुक्रवारी आयएमएफकडून एक निवेदन प्राप्त झाले आहे. ज्यामध्ये, नवव्या पुनरावलोकनासाठी आवश्यक असलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्याचा पाकिस्तान सरकारचा दावा फेटाळून लावला आहे.

पहिला हप्ता अद्यापही रखडला आहे

IMF ने पाकिस्तानला मंजूर केलेल्या कर्जाच्या रकमेचा पहिला हप्ता अद्याप प्रलंबित आहे. IMF ने 2019 मध्ये पाकिस्तानसाठी निश्चित केलेला बेलआउट प्रोग्राम जूनमध्ये पूर्ण होईल. तोपर्यंत कर्जाचे हप्ते न मिळाल्यास हा प्रोग्राम संपुष्टात येईल.

यासाठी आयएमएफने पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणि आर्थिक कार्यक्रमांबाबत आढावा बैठकांची मालिका सुरु केली होती. आठ बैठकांनंतर नवव्या बैठकीत आयएमएफने काही जाचक अटी घातल्या, मात्र यावरुन वाद निर्माण झाला.

आता प्रश्न उपस्थित होत आहे की, 9व्या आणि 10व्या आढावा बैठकीच्या अजेंड्यावर चर्चा करण्यासाठी कोणतीही संयुक्त बैठक होणार का? या प्रश्नाच्या उत्तरात, IMF चे पाकिस्तान मिशनचे प्रमुख नॅथन पोर्टर म्हणाले की, पुनरावलोकन प्रक्रिया स्वतःच पुढे जाईल.

दरम्यान, IMF ने पाकिस्तान सरकारला पहिल्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या प्रस्तावित अर्थसंकल्पावर चर्चा करण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानमध्ये खाद्य संकट

वृत्तपत्राने, पाकिस्तानमधील आयएमएफ मिशनचे प्रमुख नॅथन पोर्टर यांच्या हवाल्याने म्हटले की, आयएमएफ पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे.

विशेष म्हणजे, पाकिस्तान आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. त्यामुळे खाद्य संकट निर्माण झाले आहे.

सर्वसामान्यांमध्येही प्रचंड असंतोष असून त्यांनी सरकार आणि देशाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT