इस्लामाबाद: पाकिस्तानातील (Pakistan Politics) राजकीय पेचप्रसंगात इम्रान खान (Imran Khan) यांना पंतप्रधानपद गमवावे लागले असून आता ते निवडणुकीत जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. अविश्वास ठराव फेटाळून त्यांनी आपली प्रतिष्ठा तर वाचवली मात्र आता आपली सत्ता वाचवूशकतील का असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. इम्रान सरकारल (Pakistan Government) हीच बाजी कठीण जाऊ शकते. विरोधक एक झाले असून, या निवडणुकीत इम्रान यांना सत्ता मिळाली नाही, तर त्यांना निश्चितच शिक्षा होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली (National Assembly of Pakistan) बरखास्त करण्यात आली आहे, त्यामुळे देशात 90 दिवसांत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. निवडणुकीत (Election) विरोधकांचा विजय झाला तर इम्रान खान यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
इम्रानची अवस्थाही जनरल परवेझ मुशर्रफसारखी
विरोधकांनी अनेक आघाड्यांवर इम्रानला देशद्रोही म्हटले आहे. इम्रानची अवस्थाही जनरल परवेझ मुशर्रफसारखी असू शकते . एकेकाळी, नवाझ शरीफ सरकारने मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता आणि न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मुशर्रफ अजूनही पाकिस्तानपासून दूर दुबईत आहेत. त्याच्या या प्रसंगाबाबत पाकिस्तानमध्ये अनेक अफवा आणि अटकळ सुरू आहेत.
इम्रान खान यांच्या पक्षाला बहुमत मिळाले नाही तर...
आता होणाऱ्या निवडणुकीच्या निकालावरच पाकिस्तानच्या भविष्याचे चित्र स्पष्ट होईल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. इम्रान खान यांच्या पक्षाला बहुमत मिळू शकले नाही, तर विरोधक त्यांच्याकडून नक्कीच बदला घेतील. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू आणि आता विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी, इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळून राज्यघटनेच्या विरोधात कृत्य केल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, इम्रान खान यांनी पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव फेटाळला होता आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांची भेट घेतली आणि देशात परकीय षड्यंत्राचा हवाला दिला होता. राष्ट्रपतींनी नॅशनल असेंब्ली बरखास्त करून देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या होत्या, असा घटनाक्रम शरीफ यांनी सांगितला.
मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता
इम्रान खान यांची अवस्था मुशर्रफ यांच्यासारखी होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. 1999 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ सरकार उलथून टाकले होते. नवाझ शरीफ यांना आधी नजरकैदेत ठेवण्यात आले आणि नंतर तुरुंगात टाकण्यात आले. मुशर्रफ पाकिस्तानचे अध्यक्ष झाले आणि ऑगस्ट 2008 पर्यंत या पदावर राहिले. मुशर्रफ यांना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुशर्रफ यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. काही काळानंतर त्यांना निवडणुका घ्याव्या लागल्या, त्यानंतर पीपीपीची सत्ता आली आणि त्यानंतर मुशर्रफ यांनी आपले पद सोडले. यानंतर 2013 मध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) सत्तेत आल्यावर आणि नवाझ शरीफ पंतप्रधान झाल्यावर त्यांनी मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. मुशर्रफ उपचारासाठी दुबईला गेले आणि ते परत आलेच नाहीत, दरम्यान खटला चालला आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली, ज्याला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.