China - America Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: 'रशियाला मदत केल्यास...,' अमेरिकेने दिली चीनला धमकी

रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनमधील युद्धासाठी "युध्दसहाय्य" दिल्यास चीनला निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. यातच आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनमधील युद्धासाठी "युध्दसहाय्य" दिल्यास चीनला (China) निर्बंधांना सामोरे जाऊ लागू शकते. अमेरिकेच्या एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने पुन्हा हा एकदा इशारा दिला आहे. त्याचबरोबर भारताचे रशियन शस्त्रांवरील अवलंबित्व संपवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. (If China helps Russia with its war in Ukraine it could face US sanctions)

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या (America) परराष्ट्र विभागाच्या उप परराष्ट्र सचिव वेंडी शर्मन यांनी गुरुवारी ब्रुसेल्समध्ये एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, 'चीन सध्याच्या परिस्थितीत रशियाला कोणत्याही प्रकारची मदत पुरवणार नाही. त्याचबरोबर चुकीच्या मोहिमेला खतपाणी घालून मदत करणार नाही.' ते पुढे म्हणाले की ''आम्हाला आशा आहे की चीन (China) रशियाच्या युद्धातून "योग्य धडा" घेईल ज्यामध्ये हे स्पष्ट आहे की, अमेरिका त्याच्या मित्र राष्ट्रांपासून वेगळे होऊ शकत नाही.''

दरम्यान, ''निर्बंधांचा दृष्टीकोन, निर्यात नियंत्रणे आणि रशियाच्या बाबतीत आम्ही काय केले ते त्यांनी पाहायला हवे. चीनने रशियाला खरोखर मदत केल्यास चीनचे काय होऊ शकते हे लक्षात ठेवायला हवे." असे शर्मन यांनी म्हटले आहे. रशियन शस्त्रास्त्रांवरील जागतिक निर्बंध लक्षात घेता, अमेरिका भारतासोबत काम करु इच्छित आहे. जेणेकरुन भारत पारंपारिक रशियन शस्त्रांवरील अवलंबित्व कमी करु शकेल, असेही शर्मन यावेळी म्हणाले.

दुसरीकडे, चीनने या आठवड्यात सांगितले होते की, 'आम्ही रशियासोबतचे धोरणात्मक संबंध मजबूत करत आहोत.' पुतिन यांच्या लष्कराकडून युक्रेन युद्धात होत असलेल्या वाढत्या युद्धगुन्ह्यांवर चीनने चिंताही व्यक्त केली आहे. हे वक्तव्य अशा वेळी आले आहे की, जेव्हा चिनी कंपन्या अमेरिकेच्या निर्बंधांचा सामना करत आहेत. तर सरकार सार्वभौमत्वाच्या नावाखाली त्यांचा विरोध करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT