Russia-Ukraine War  dainikgomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War : ICJ ने दिले रशियाला युक्रेनवरील आक्रमण थांबविण्याचे आदेश

ICJ चे रशियाला आक्रमण थांबवण्याचे आदेश

दैनिक गोमन्तक

Russia-Ukraine War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेत हे युद्ध थांबवावे, तसेच रशियाने युद्धाच्या निमित्ताने निष्पाप नागरिकांचा नरसंहार केल्याचा आरोप केला होता. तसेच युक्रेनमध्ये रशियाला लष्करी कारवाई (Military) आणि शिक्षा थांबवण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने द्यावेत अशी मागणी केली आहे. त्या मागणीला यश आल्याचे दिसत असून संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) रशियाला युक्रेनवरील आक्रमण थांबवण्याचे आदेश दिले आहेत. (ICJ ordered Russia to immediately suspend the invasion of Ukraine)

रशिया-युक्रेन युद्धाचा आजचा 21 दिवस असून हे युद्ध थांबावे म्हणून अनेक देशांनी प्रयत्न केले आहेत. तर रशिय आणि युक्रेन (Ukraine) मध्ये शांततेसाठी बैठका ही सुरू आहेत. याच दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयात मतदान घेत 13-2 मतांनी निर्णय दिला. तसेच न्यायालयाने म्हटले की, रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनच्या भूभागावर सुरू केलेल्या लष्करी कारवाई ताबडतोब स्थगित करा. मात्र यावेळी केवळ रशियन (Russia) आणि चीनच्या (china) न्यायाधीशांनी या आदेशाच्या विरोधात मतदान केले.

दरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हा आदेश दिल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी न्यायालयाच्या (ICJ) या आदेशाचे स्वागत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT