Shoaib Akhtar Dainik Gomantak
ग्लोबल

Shoaib Akhtar: 'पाकिस्तानपेक्षा मला जास्त श्रीमंत व्हायचंय'; शोएब अख्तर

Shoaib Akhtar wealth ambition: डबघाईला आलेल्या पाकिस्तानपेक्षा जास्त श्रीमंत व्हायचंय, अशी इच्छा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने व्यक्त केलीय.

Pramod Yadav

Shoaib Akhtar statement on being richer than Pakistan

कराची: नेहमी वादग्रस्त विधान करण्यात पटाईत असणाऱ्या पाकिस्तानाच्या माजी क्रिकेटर शोएब अख्तरने त्यांच्या देशापेक्षा जास्त श्रीमंत होण्याच्या इच्छा व्यक्त केलीय. मला पाकिस्तानपेक्षा जास्त श्रीमंत व्हायचंय, असं शोएबने म्हटलंय. पाकिस्तान चीनकडून घेतलेल्या कर्जाच्या बोजाखाली दबला असून, देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलीय.

रावळपिंडी एक्सप्रेस प्रसिद्ध असणाऱ्या शोएब अख्तरने TNKS पॉडकास्टच्या कार्यक्रमात पाकिस्तानमधील पहिला अमेरिकन डॉलर अब्जाधीश होण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. एक दिवस संपूर्ण पाकिस्तानपेक्षा श्रीमंत होण्याचे त्यांचे ध्येय असल्याचे अख्तरने नमूद केले. अख्तरने यावेळी कोहली विरुद्ध तेंडुलकर वादावरही भाष्य केले. सध्याच्या काळातील वेगवान गोलंदाजी मानके आणि तेंडुलकरच्या काळातील फरक अधोरेखित केला.

'मी पाकिस्तानचा पहिला अमेरिकन डॉलर अब्जाधीश होणार आहे. मला एक दिवस पाकिस्तानपेक्षा श्रीमंत व्हायचे आहे. मी चेष्टा करत नाहीये. मी याबाबत गंभीर आहे', असं अख्तर म्हणाला.शोएब अख्तरने पॉडकास्टवर

उपलब्ध आकडेवारीनुसार, पाकिस्तानी उद्योगपती मियां मुहम्मद मनशा यांची अंदाजे एकूण संपत्ती 5 अब्ज डॉलर आहे. त्यामुळे पाकिस्तानचा 'पहिला' अब्जाधीश होण्याचे लक्ष्य ठेवण्याचा अख्तरचा दावा असामान्य वाटतो.

यावेळी शोएबने सचिन आणि विराटची होणारी तुलना यावर देखील भाष्य केले. 'सचिन एक महान खेळाडू होते. विराट पण महान खेळाडू आहे पण, विराटची सचिनसोबत तुलना नाही होऊ शकत. सचिनने प्रतिभावान गोलंदाजांचा सामना केला आहे. रिकी पॉन्टिंग देखील प्रतिभावान खेळाडू होता', असे शोएब म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Population: लोकसंख्या का वाढवता?

Sanjivani Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी वेतनाविना; वित्त खात्यात फाईल प्रलंबित, 2 महिन्यांचे वेतन अडल्याने कोंडी

Goa Traffic Diversion: मेरशी येथील अटल सेतूवर जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी 25 जूनपर्यंत बंद, पर्यायी मार्ग कोणता?

Lucky Zodiac Sign: अब्जाधीश होण्याचा सुवर्णयोग! बँक बॅलन्स वाढणार अन् टेन्शन मिटणार; 20 जूनपासून 5 राशींचे नशीब पालटणार

कुडचडेतील ओहोळात अचानक माशांचा मृत्यू; कचरा प्रक्रिया प्रकल्पावर स्थानिकांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT