Wuhan Lab Dainik Gomantak
ग्लोबल

'Coronavirus कैसे पैदा हुआ?' तपास थांबवण्यासाठी चीन लागला कामाला!

कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) उत्पत्तीबद्दल चर्चेत असलेली चीनची वुहान लॅब (Wuhan Lab) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाच्या नव नव्या व्हेरिएंटचा पुन्हा एकदा प्रसार वाढू लागल्यामुळे चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. याच पाश्वभूमीवर कोरोनाच्या उत्पत्तीबद्दल चर्चेत असलेली चीनची वुहान लॅब (Wuhan Lab) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रॉव्हिडन्सच्या अहवालानुसार, प्रॉव्हिडन्सच्या अहवालानुसार, वुहान लॅबवर देखरेख ठेवण्यासाठी चीनचे (China) अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी लष्करी जनरलची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. या विषाणूच्या उत्पत्ती स्थळाबद्दल जिनपिंग यांनी आत्तापर्यंत पारदर्शक (Transparent) माहीत समोर येऊ दिलेली नाही. चिनी कम्युनिस्ट पार्टी (CCP) मीडियाने बनावट स्विस व्हायरोलॉजिस्टचा हवाला दिला आहे. तर दुसर्‍या घटनेत वुहानमधील लॉकडाऊनचे रिपोर्टिंग केल्याबद्दल एका चिनी पत्रकाराला तुरुंगात टाकण्यात आले होते.

दरम्यान, जगाने चीनमधून उत्पतीत झालेल्या कोरोना विषाणूची चौकशी करणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाने कोविडच्या उत्पत्तीची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर चीनने कॅनबेरासोबत 'व्यापार युद्ध' सुरु केले. चीनच्या वुहानमधील कोरोना प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत, परंतु विशाणूची उत्पत्ती कशी झाली याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

तसेच, कोरोना महामारीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्याचबरोबर या कोरोना काळात आर्थिक आणि सामाजिक हानीही मोठी झाली. फेब्रुवारी 2020 च्या सुमारास, जेव्हा वुहानपासून जगाच्या इतर भागांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढू लागला, तेव्हा सत्ताधारी पक्षाने कोरोनाच्या उत्पत्तीसंबंधी प्रकाशन करण्यास मनाई करणारा आदेश जारी केला होता. त्याचवेळी लॅबमधून विषाणू लीकच्या घटना पुढे येत गेल्या, आणि जगाला अशा धक्कादायक घटनांची माहिती मिळत गेली. डिसेंबर 2021 मध्ये, तैवानने अधिकृतपणे SARS-COV-2 लॅबमधील लीकबद्दल पुष्टी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

SCROLL FOR NEXT