Pakistan MP Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानातील हिंदू खासदाराने केली घोषणा चार्टर्ड फ्लाइटने यात्रेकरुंना करणार ‘भारतवारी’

पाकिस्तान (Pakistan) तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या हिंदू खासदाराने सोमवारी जाहीर केले की, या आठवड्याच्या शेवटी यात्रेकरुंसह आम्ही भारताला भेट देणार आहोत.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (Tehreek-E-Insaf) पक्षाच्या हिंदू खासदाराने सोमवारी जाहीर केले की, या आठवड्याच्या शेवटी यात्रेकरुंसह आम्ही भारताला भेट देणार आहोत. यात्रेकरुंसाठी चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. (Hindu MP From Pakistan Tehreek-E-Insaf Will Visit India With Pilgrims)

दरम्यान, पाकिस्तान (Pakistan) हिंदू परिषदेचे प्रमुख आणि नॅशनल असेंब्लीचे सदस्य डॉ. रमेश कुमार वांकवानी यांनी सांगितले की, ‘’शिष्टमंडळ 29 जानेवारीला त्यांच्यासोबत भारताला रवाना होणार आहे. हे पाकिस्तान एअरलाइन्स इंटरनॅशनल (PIA) चे चार्टर्ड फ्लाइट असेल. यात्रेकरु तीन दिवस भारतात राहणार आहेत. यादरम्यान ते दिल्लीतील दर्गा हजरत निजामुद्दीन औलिया, आग्र्यातील अजमेर दर्गा ख्वाजा गरीब नवाज आणि ताजमहालला भेट देतील.’’

वांकवानी पुढे म्हणाले, "पाकिस्तानी यात्रेकरुंना भारतातील सर्व धार्मिक स्थळांवर फक्त पीआयएच्या विमानाने नेले जाईल. भारतीय यात्रेकरु एअर इंडियाच्या विमानाने पाकिस्तानला जातील." तसेच म्हणाले की, ‘’या भागातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी एअर इंडियाचे विमान 20 फेब्रुवारीला दिल्लीहून पेशावरला जाणार आहे. यात्रेला येणारे यात्रेकरु श्री परमहंस जी महाराजांच्या समाधीला आणि खैबर पख्तूनख्वाच्या कडाक भागातील तेरी मंदिराला भेट देतील.’’

‘दोन्ही देशांमधील उड्डाणे महिनानिहाय सुरु केली जातील. दोन्ही देशांदरम्यान धार्मिक पर्यटन सुरु झाल्याने लोकही एकमेकांच्या संपर्कात येतील,’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT