आयशा मलिक बनल्या Pakistan Supreme Court च्या पहिल्या महिला न्यायाधीश

आयशा मलिक (Ayesha Malik) यांनी सोमवारी पाकिस्तानात देशातील पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश (Pakistan Supreme Court Female Judge) म्हणून शपथ घेतली.
Ayesha Malik
Ayesha MalikDainik Gomantak
Published on
Updated on

आयशा मलिक (Ayesha Malik) यांनी सोमवारी पाकिस्तानात देशातील पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश (Pakistan Supreme Court Female Judge) म्हणून शपथ घेतली. शेजारील देशात याकडे ऐतिहासिक प्रसंग म्हणून पाहिले जात आहे. कारण पाकिस्तानातील कायदा अनेकदा महिलांच्या विरोधात असल्याचे कार्यकर्ते सांगत असतात. राजधानी इस्लामाबादमध्ये एका समारंभाला उपस्थित राहून मलिक यांनी न्यायाधीश शपथ घेतली. त्या आता पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयातील (Pakistan Supreme Court) 16 पुरुष सहकाऱ्यांच्या खंडपीठात सामील झाल्या आहेत. (Ayesha Malik Became The First Woman Judge Of The Supreme Court Of Pakistan)

दरम्यान, वकील आणि महिला हक्क कार्यकर्त्या निघत दाद यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘’हे एक मोठे पाऊल आहे. पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेच्या निर्मितीचा हा इतिहास आहे. आयशा मलिकने हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या दोन दशकांपासून त्या पाकिस्तानातील (Pakistan) लाहोर (Lahore) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या. पंजाब प्रांतातील पितृसत्ताक कायदेशीर प्रथा बदलण्याचे श्रेय त्यांना जाते. गेल्या वर्षी त्यांनी बलात्कार पीडितांची वादग्रस्त वैद्यकीय तपासणी रद्द केली होती. त्याबद्दल त्यांचे जगभरातून कौतुक झाले होते.’’

Ayesha Malik
तालिबान ला मान्यता मिळनार? नॉर्वे येथे चर्चा सुरू

परंपरावादी देशात महिलांना पुढे जाण्याचा मार्ग खुला होईल

बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये न्याय मिळवण्यासाठी पाकिस्तानातील महिलांना अनेकदा संघर्ष करावा लागतो. या वैद्यकीय चाचणीचा वापर पीडितांवर हल्ला करgन त्यांची बदनामी करण्यासाठी केला जात होता. मलिक यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती दिल्याने इस्लामिक रिपब्लिकच्या ऐतिहासिकदृष्ट्या पुराणमतवादी आणि पुरुषप्रधान न्यायालयात अधिक महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पाकिस्तान हा मुस्लिमबहुल देश म्हणून ओळखला जातो, जिथे महिलांना पुढे जाण्यासाठी अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो.

आयशा मलिक यांची नियुक्ती वादात सापडली

पेशाने वकील आणि महिला हक्क कार्यकर्त्या असलेल्या खदिजा सिद्दीकी म्हणाल्या, त्यांनी न्यायव्यवस्थेतील सर्व अडथळे मोडून काढले आहेत. त्यामुळे आता इतर महिला पुढे जाऊ शकतील. मला आशा आहे की, यामुळे भविष्यात न्यायालयाकडून अधिक महिला-केंद्रित निर्णय होतील. मात्र त्यांची नियुक्ती गेल्या चार महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. किंबहुना, या पदासाठी अधिक पात्र ज्येष्ठ पुरुष उमेदवारांपेक्षा त्यांना प्राधान्य देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आयशा मलिक यांच्या नामांकनाच्या निषेधार्थ पाकिस्तान बार कौन्सिलने संप केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com