Hina Rabbani Khar Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात हिना रब्बानी खार बनल्या परराष्ट्र राज्यमंत्री

शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात महिलांना मोठे स्थान देण्यात आले आहे. यातच हिना रब्बानी खार पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री बनल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Pakistan: पाकिस्तानचे नव निर्वाचित पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाला पाकिस्तान सिनेटचे अध्यक्ष सादिक संजरानी यांनी शपथ दिली. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना शपथ दिली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रपती भवनात कुराणाच्या श्लोकांच्या पठणाने झाली. शाहबाज यांनी तीन सल्लागारही नियुक्त केले आहेत. यासह पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्रिमंडळात 37 सदस्य आहेत. एका ट्विटमध्ये शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी म्हटले आहे की, ''पीएमएल-एन नवाझ शरीफ आणि सरकारच्या सहयोगी भागीदारांशी सल्लामसलत केल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली आहे.'' यातच हिना रब्बानी खार (Hina Rabbani Khar) पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री बनल्या आहेत.

दरम्यान, रेडिओ पाकिस्तानच्या (Pakistan) वृत्तानुसार, पीएमएल-एनच्या मरियम औरंगजेब यांची माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि आझम नझीर तरार यांची कायदा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमएल-एनचे एहसान इक्बाल यांची नियोजन आणि विकास मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट- पाकिस्तानचे अमिनुल हक यांनी माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. अमिनुल हक यांनी यापूर्वीच्या पीटीआय सरकारमध्येही हेच पद भूषवले होते.

याशिवाय पीपीपीच्या हिना रब्बानी खार यांना परराष्ट्र मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आले आहे, तर पीएमएल-एनचे राणा सनाउल्लाह यांच्याकडे गृहमंत्रालय आहे. पाकिस्तानमधील शाहबाज सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा सोमवारी होणार होता परंतु राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी खासदारांना शपथ घेण्यास नकार दिला, त्यामुळे हा सोहळा मंगळवारी पुढे ढकलण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT