Flood In Kenya Dainik Gomantak
ग्लोबल

Flood In Kenya: मुसळधार पावसामुळे केनियात 'हाहाकार', 42 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

Kenya: केनियाच्या मीडियानुसार, सोमवारी दुपारपर्यंत या भीषण दुर्घटनेतील मृतांची संख्या 42 वर पोहोचली आहे. येथील जनजीवन प्रभावित झाले आहे.

Manish Jadhav

Flood In Kenya: मध्य केनियातील माई माहिउ भागात पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. केनियाच्या मीडियानुसार, सोमवारी दुपारपर्यंत या भीषण दुर्घटनेतील मृतांची संख्या 42 वर पोहोचली आहे. येथील जनजीवन प्रभावित झाले आहे.

दरम्यान, पुरामुळे माई माहिउ भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सरकारने बोटीच्या सहाय्याने लोकांना त्यांच्या घरातून सुरक्षित बाहेर काढले आहे. पुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. केनिया सरकारने पूरग्रस्त भागांजवळ मदत शिबिरे उभारली आहेत. या शिबिरांमध्ये लोकांसाठी भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

केनियाच्या हवामान खात्याने येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. केनियातील अनेक राज्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे येथे विध्वंस झाला आहे. पूर्व आफ्रिकेतील माकुएनी परगण्यातील नदी दुथडी भरुन वाहत आहे. यापूर्वी, मार्च 2024 मध्ये केनियामध्ये पुरामुळे 70 लोकांचा मृत्यू झाला होता.

200 हून अधिक लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले

केनिया रेड क्रॉस सोसायटीच्या म्हणण्यानुसार, देशभरातील पूरग्रस्त भागातून 200 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. याशिवाय, आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. मार्चमध्ये केनियाच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून येथे पावसाचा जोर वाढला असून 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT