या वर्षी हे तापमान 49. 5 अंश पर्यंत गेले आहे Dainik Gomanatk
ग्लोबल

रेकॉर्ड ब्रेक: कॅनडाच्या 200 पेक्षा जास्त लोकांचा उष्माघाताने मृत्यू

त्यामुळे या भागातील लोकांना याची झळ बसली असून आतापर्यंत 200 पेक्षा अधिक लोक मरण पावल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

व्हँकुवर (Vancouver) हे शहर ब्रिटिश कोलंबियातील आहे. हे कॅनडाच्या (Canada) नैऋत्य भागातील पॅसिफिकमहासागरा जवळ आहे. जून महिन्यात येथील तापमान (Temperature) 20 अंशापर्यंत असते. परंतु या वर्षी हे तापमान (Temperature) 49. 5 अंश पर्यंत गेले आहे. त्यामुळे या भागातील लोकांना याची झळ बसली असून आतापर्यंत 200 पेक्षा अधिक लोक मरण पावल्याची माहिती समोर आली आहे.

29 जूनला सर्वात अधिक तापमान कोलंबियामधील लिटन येथे 49. 5 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. याआधी कॅनडातील तापमान 45 अंश सेल्सियसच्यावर कधीही गेले नाही. वायव्य अमेरिका आणि कॅनडा या देशांच्या वर सध्या तयार झालेल्या उच्च दाबमुळे ही उष्णतेची लाट तयार झाली आहे. तज्ञांच्या मते, हवामानात झालेल्या बदलामुळे ही परिस्थिति निर्माण झाली आहे. येथील लोकांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेणे हे कठीण जात आहे.

व्हँकुवर शहरात 65 लोकांचा मृत्यू या अतिउष्णतेच्या लाटेमुळे झाल्याची शक्यता आहे. यापूर्वी येथे अशी लाट कधीच आली नव्हती. येथील लोक घरच्या बाहेर पडण्यास टाळत आहेत. इथे 30 अंशापर्यंत लोकांना उन्हाची सवय होती. परंतु यंदा तापमान 49 अंशापर्यंत गेल्याने लोकांना घरात बसने देखील अवघड झाले आहे. कारण येथे अनेकांच्या घरात एसी नाहीत. शहरात अनेक ठिकाणी तात्पुरते पाण्याचे कारंजे आणि कूलिंग सेंटर उभारण्यात आली आहेत. कॅनडाच्या हवामान खात्याने ब्रिटिश कोलंबियात अल्बर्टा व स्साक्त्चेवान या भागात अतिउष्णतेचा इशारा दिला आहे.

अमेरिकेत 28 जूनला पोर्टलँड आणि ओरेगॉन येथे 46. 2 तर सिएटल आणि वॉशिंग्टन येथे 42. 2 अंश सेल्सियस एवढ्या तपमानची नोंद झाली आहे. वॉशिंग्टन आणि ओरेगॉन येथील काही लोकांच्या मृत्यूचे कारण येथील उष्णतेची लाट असू शकते. उष्णतेमुळे आता शहर वाळवंटी प्रदेशासारखे झाले आहे. येथील सर्व लोक टी-शर्ट आणि हाफ पॅन्टवर फिरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT