Pope Francis Dainik Gomantak
ग्लोबल

Pope Francis: पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक, दहा दिवसांपासून सुरु आहेत उपचार

Pope Francis Health Update: उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी पोप यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे सांगितले आहे.

Pramod Yadav

 88-year-old Pope Francis admitted to Rome's Gemelli Hospital 

पोप फ्रान्सिस (८८) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या उपचारामुळे त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले आहे, अशी माहिती व्हॅटिकन सिटीने प्रसिद्ध केली आहे.

उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी पोप यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे सांगितले. प्रकृती गंभीर असली तरी शनिवारपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवला नाही, अशी माहिती आहे. दरम्यान, त्यांना दिल्या जाणाऱ्या ऑक्सिजनची पातळी अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

पोप रविवारी देखील सतर्क होते आणि प्रतिसाद देत होते. हॉस्पिटलच्या बेडवरूनच त्यांनी मासला देखील हजेरी लावली.

पोप फ्रान्सिस यांचे वय, फुफ्फुसाचा आजार आणि त्यांना जाणवत असलेला अशक्तपणा यामुळे अद्याप त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. न्यूमोनिया होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सेप्सीसचा धोका डॉक्टरांनी वर्तवला आहे. दरम्यान, व्हॅटिकन वैद्यकीय अपडेटनुसार, पोप यांच्यात अद्याप असा काही धोका उद्भवलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली शहराला कचऱ्याचे ‘ग्रहण’! बाजारात दुर्गंधी, जनावरांचा वाढला उपद्रव

Aldona: 'फुटसाल मैदानाची जागा बदला'! हळदोणे ग्रामस्थांची मागणी; फेरेरांनी केले पर्यायी जागा सुचवण्याचे आवाहन

Name Change: 37 वर्षाच्या व्यक्तीला 42 वर्षांचा मुलगा कसा? नाव बदलून 'नीज गोंयकार' भासवण्याचा परप्रांतीयांचा खटाटोप

Goa Assembly Live: आलेमाव यांनी वनहक्क दाव्यांचा मुद्दा उपस्थित केला

Opinion: जून, जुलैत गोव्यात पाऊस उसंत न घेता अक्षरश: कोसळत असतो..

SCROLL FOR NEXT