Indonesia law Dainik Gomantak
ग्लोबल

Indonesia New Law: इंडोनेशियात लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्यास मिळणार 'ही' शिक्षा

लाईफ पार्टनरशिवाय इतरांशी शारीरिक संबंध ठरणार गुन्हा

Akshay Nirmale

Indonesia New Law: इंडोनेशियामध्ये आता लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्यावर कायदेशीर बंदी येणार आहे. त्यासाठी नव्या कायद्याचा मसुदा तयार केला गेला आहे. त्यानुसार पती-पत्नी यांनाच शारिरीक संबंध ठेवण्याचा अधिकार असणार आहे. लग्नाच्या पार्टनरशिवाय इतरांशी शारिरीक संबंध ठेवणे गुन्हा समजला जाणार आहे.

या नियमांचा भंग केल्यास एक वर्षाची शिक्षा आणि दंड अशी शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. सरकारने या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. लवकरच तो येथील संसदेत सादर केला जाऊ शकतो. संसदेचे सदस्य बॅमबँग व्हुर्यांतो यांनी सांगितले की, हा कायदा पुढच्या आठवड्यात मंजूर केला जाणार आहे.

काय आहे नव्या कायद्यात...

नवा कायदा अंमलात आल्यानंतर देशात लग्नाशिवाय शारिरीक संबंध ठेवणे गुन्हा समजला जाईल. तसेच केवळ पती-पत्नी हेच शारिरीक संबंध ठेऊ शकतील. जेव्हा आई-वडील तक्रार दाखल करतील तेव्हा यात अविवाहितांवरही कारवाई होऊ शकते. पती किंवा पत्नी वगळता इतरांशी शारिरीक संबंध ठेवल्यास तो देखील गुन्हा ठरेल. यात संबंधित महिला किंवा पुरूषाने पार्टनरविरोधात गुन्हा दाखल करावा लागेल.

या कायद्यानुसार कोर्टात सुनावणीआधीच तक्रार मागे घेता येऊ शकते. पण एकदा सुनावणी सुरू झाल्यावर कायद्यानुसारच कारवाई होईल. नियमभंग करणाऱ्यांना एक वर्षाची शिक्षा होऊ शकते, तसेच दंडही केला जाऊ शकतो. इंडोनेशियात तीन वर्षांपुर्वीही सरकारने हा कायदा आणण्याची तयारी केली होती. पण हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून याला विरोध दर्शविला होता. हा कायदा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते. वाढता विरोध पाहून सरकारने माघार घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT