Israel Hamas War Video 
ग्लोबल

Israel Hamas War Video: हमासचा इस्रायलमधील संगीत कॉन्सर्टवर हल्ला; 260 ठार, एक महिन्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

संगीत कॉन्सर्टमध्ये एकत्र आलेल्या सुमारे 3,500 तरुण इस्त्रायलींना दहशतवाद्यांनी लक्ष्य करत गोळीबार केला

Pramod Yadav

Israel Hamas War Video: हमास आणि इस्रायल यांच्यात मागील एक महिन्यापासून युद्ध सुरु आहे. इस्रायलने 07 ऑक्टोबर 2023 रोजी हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली. दरम्यान, हमास दशतवाद्यानी दक्षिण इस्रायलमधील एका संगीत कॉन्सर्टवर हल्ल्या करुन केलेल्या हत्याकांडाचा भीषण व्हिडिओ आता समोर आला आहे. यात 260 जणांची हत्या हमास दशतवाद्यानी केली आहे.

दोन मिनिट आणि 52 सेकंदाच्या या व्हिडिओ हमासचे दशतवाद्यानी इस्रायलमधील संगीत कॉन्सर्टच्या ठिकाणी हातात बंदूक घेऊन वावरताना दिसत आहेत. संगीत कॉन्सर्टच्या ठिकाणी अनेक तरुण तरुणी मृत्युमुखी पडल्याचे दिसत आहेत.

काही ठिकाणी मृतदेहांचे खच पडले आहेत. इस्रायलने 07 ऑक्टोबर 2023 रोजी हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली, त्यावेळचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे.

या सुपरनोव्हा ट्रान्स म्युझिक फेस्टिव्हलमध्ये किमान 260 लोकांची हत्या करण्यात आली आणि अनेकांचे अपहरण करण्यात आले, असे इस्रायली अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

संगीत कॉन्सर्टमध्ये एकत्र आलेल्या सुमारे 3,500 तरुण इस्त्रायलींना दहशतवाद्यांनी लक्ष्य करत गोळीबार केला. यात काहीजण मद्य किंवा ड्रग्सच्या प्रभावाखाली होते, ज्यामुळे अधिक गोंधळ आणि भीती निर्माण झाली.

दरम्यान, इस्रायल-हमास युद्धाला चौथा आठवडा पूर्ण झाला आहे. या युद्धामुळे गाझा पट्टीत आतापर्यंत हजारो पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीतून हमासचा खात्मा करण्यासाठी लष्कर सातत्याने बॉम्ब वर्षाव करत आहे. जवळपास महिनाभर सुरू असलेले हे युद्ध अद्याप संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. युद्धबंदीबाबतही चर्चा होताना दिसत नाही.

या युद्धात इस्रायलमध्ये 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 200 लोकांचे अपहरणही झाले आहे. इस्रायली लष्कराच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईमुळे गाझामध्ये मरण पावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 9200 हून अधिक झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT