Mexico Firing Dainik Gomantak
ग्लोबल

Mexico Firing: मेक्सिकोमध्ये पार्टीत घुसून बंदूकधाऱ्यांनी घातला हैदोस, गोळीबारात 6 जणांचा मृत्यू; 26 जण जखमी

Mexico Firing: नववर्ष सुरु होण्याच्या अवघ्या 3 दिवस आधी मेक्सिकोमध्ये शोककळा पसरली आहे. एका पार्टीत बंदूकधाऱ्यांनी हैदोस घातला.

Manish Jadhav

Mexico Firing: नववर्ष सुरु होण्याच्या अवघ्या 3 दिवस आधी मेक्सिकोमध्ये शोककळा पसरली आहे. एका पार्टीत बंदूकधाऱ्यांनी हैदोस घातला. पार्टीसाठी एकत्र आलेल्या लोकांमध्ये अचानक घुसलेल्या बंदूकधाऱ्यांनी गोळीबार सुरु केला आणि एकच खळबळ उडाली. दरम्यान, जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावू लागले. गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. उत्तर मेक्सिकोमध्ये शुक्रवारी पहाटे तीन बंदुकधारींनी एका पार्टीत घुसून गोळीबार केला. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, मृतांपैकी दोघांचे वय 18 वर्षांखालील असून जखमींमध्ये पाच मुलांचाही समावेश आहे. यावरुन बंदूकधाऱ्यांचा धोकादायक हेतू समजू शकतो. गोळीबार करताना गुन्हेगारांनी लहान मुलांनाही सोडले नाही. सर्व जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर 13 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सोनोरा या सीमावर्ती राज्यातील सरकारी वकिलांनी सांगितले की, हा हल्ला सियुडाड ओब्रेगोन शहरातील एका पार्टीदरम्यान झाला जिथे गॅंगचा सदस्य संशयित होता.

दुसरीकडे, तीन बंदूकधाऱ्यांनी हा हल्ला केल्याचे समजते पण त्यांचा चौथा सहकारी पार्टीत उपस्थित होता. हल्ल्यादरम्यान, वॉन्टेड गॅंगच्या सदस्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु तो मारला गेला. हल्ल्यानंतर बंदूकधारी पळून गेले. सोनोरा येथे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अनेक गॅंग सक्रिय असून त्यांच्यात वर्चस्वासाठीच्या लढाईत अनेकदा रक्तपात घडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT