G-20 Summit| Dainik Gomantak
ग्लोबल

G-20: ग्लोबल स्टार्ट-अप मजबूत करण्याचे पियुष गोयल यांचे आवाहन,म्हणाले...

G-20: नवनिर्मितीला पाठिंबा देणे ही एका देशाची जबाबदारी नसून या जागतिक प्रयत्नांना चालना देण्याची जगातील सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे.

दैनिक गोमन्तक

G-20: भारताला 2023 मध्ये जी-20 चे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. भारतासाठी जगाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी ही मोठी संधी असल्याचे वक्तव्य तज्ञांनी केले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी जागतिक स्टार्ट-अप इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी मार्गदर्शक गुंतवणूकदार आणि उद्योजकांचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क तयार करण्याचे आवाहन केले आहे.

G-20 च्या स्टार्टअप 20 एंगेजमेंट ग्रुपच्या स्थापनेच्या बैठकीला त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. या नेटवर्कने स्टार्ट-अप्सना समर्थन आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. स्टार्ट-अप्ससाठी कल्पनांची देवाणघेवाण सोपे करण्यासाठी आणि संशोधन व विकासामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी एक संघ म्हणून काम केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

नवनिर्मितीला पाठिंबा देणे ही एका देशाची जबाबदारी नसून या जागतिक प्रयत्नांना चालना देण्याची जगातील सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे.

यामुळे जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक, सहाय्यक आणि टिकाऊ अशी जागतिक स्टार्ट-अप इकोसिस्टम तयार होते. G-20 चा यजमान देश या नात्याने भारताला जागतिक स्टार्ट-अप इकोसिस्टमची प्रगती आणि क्षमता वाढवण्याचा अभिमान आहे.

भारता( India)च्या G-20 अध्यक्षपदाखाली स्टार्ट-अप्सवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा एक भाग म्हणून प्रथमच स्टार्टअप-20 गटाची स्थापना करण्यात आली आहे. गोयल म्हणाले, 'अमृत काल'मध्ये विकसित भारत घडवण्यासाठी स्टार्ट-अप्स हा सर्वात मजबूत आधारस्तंभ असेल.

स्टार्ट-अप ही अर्थव्यवस्था आणि सामाजिक कल्याणासाठी एक प्रेरक शक्ती आहे. आजच्या जगात नवनिर्मिती केवळ आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यापुरते नाही, तर ते सामाजिक आणि पर्यावरणीय शाश्वततेचाही विचार करते.

कोविड-19 च्या काळात वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील आमच्या स्टार्ट अपच्या क्षमतांमुळे अनेक आव्हानांचा सामना करण्यास मदत झाली. गोयल म्हणाले की, जगाला हवामान बदलापासून ते गरिबी आणि असमानता यासारख्या अनेक जागतिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवीन कल्पना असलेले स्टार्टअप्स मदत करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT