President Gotabaya Rajapaksa preparing go to Singapore | Sri Lanka Crisis | Sri Lanka President Gotabaya Rajapaksa News Updates Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतून मालदीवमध्ये अन् आता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे सिंगापूरला जाण्याच्या तयारीत

Gotabaya Rajapaksa: सिंगापूरला जाण्यासाठी गोटाबाया राजपक्षे यांनी प्राइवेट जेटची मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेत आणीबाणी आणि निदर्शने सुरूच आहेत. दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे मालदीवमधून सिंगापूरला (Gotabaya Rajapaksa) जाण्याचा प्रयत्न करत आहेत. गोटाबाया राजपक्षे यांनी मालदीव सरकारकडे सिंगापूरला जाण्यासाठी खासगी जेटची मागणी केली आहे. डेली मिरर ऑफ श्रीलंकेच्या वृत्तानुसार, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे मालदीवमधून खासगी जेटने रवाना होण्याची वाट पाहत आहेत. (Sri Lanka Crisis Gotabaya Rajapaksa News)

श्रीलंका डेली मिररच्या रिपोर्टनुसार, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाने मालदिवहून सिंगापूरला जाण्यासाठी रवाना झाले नाहीत, परंतु आता ते एका खाजगी विमानाने प्रवास करण्यास उत्सुक आहेत.

* गोटाबाया राजपक्षे खाजगी जेटने सिंगापूरला जाणार का?

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांची पत्नी इओमा राजपक्षे हे बुधवारी रात्री SQ-437 वर त्यांच्या दोन सुरक्षा अधिका-यांसह मालदिव येथून सिंगापूरला रवाना होतील, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ते विमानात चढले नाहीत, असे मालदीवच्या (Maldives) सूत्रांनी मीहिती दिली आहे. त्यांनी मालदीव सरकारकडे खासगी जेटची मागणी केली आहे. मालदीव ते सिंगापूरला (Singapore) जाण्यासाठी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी खासगी जेट सुरक्षित करण्यासाठी आता वाटाघाटी सुरू आहेत. (Sri Lanka Gotabaya Rajapaksa News Updates)

* राजपक्षे श्रीलंकेतून मालदीवमध्ये पळून गेले

देशाची अर्थव्यवस्था ढासळल्यानंतर वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा जाहीर केला होता. श्रीलंकेच्या हवाई दलाने एका निवेदनात म्हटले आहे की, राजपक्षे त्यांच्या पत्नी आणि दोन सुरक्षा अधिकाऱ्यांसह लष्कराच्या विमानातून देश सोडून मालदीवला गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालदीवमधील नागरी उड्डाण प्राधिकरणाने लष्करी विमानाला देशात उतरवण्याची सुरुवातीची विनंती नाकारली होती. परंतु नंतर अध्यक्ष नशीद यांच्या विनंतीवरून विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT