Google Quantum Chip Willow @Google
ग्लोबल

Google Quantum Chip Willow: अब्जावधी वर्षात न सुटणारी आकडेमोड 5 मिनिटांत करणार; गुगलची Advance 'क्वांटम चिप' लॉन्च

Google Quantum Chip Willow: गुगलने नवीन क्वांटम चिप लाँच केली आहे. ‘विलो’ (Willow) असे या नव्याने विकसित करण्यात आलेल्या चीपचं नाव आहे.

Manish Jadhav

Google Quantum Chip Willow

गुगलने नवीन क्वांटम चिप लाँच केली आहे. ‘विलो’ (Willow) असे या नव्याने विकसित करण्यात आलेल्या चीपचं नाव आहे. तुम्हाला पडलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ही चीप अवघ्या पाच मिनिटांत देऊ शकते, असा गुगलकडून दावा करण्यात आला आहे.

कॅलिफोर्नियातील सांता बार्बरा येथील कंपनीच्या क्वांटम लॅबमध्ये ही चीप विकसित करण्यात आली. गुगलचे सीइओ सुंदर पिचाई यांनी ट्विट करुन या चीपबाबत माहिती दिली.

विलो चीप

गुगलची ही नवीन चीप क्वांटम कॉम्प्युटिंग क्षेत्रात एक मोठी प्रगती मानली जात आहे, जी भौतिकशास्त्राच्या तत्वांचा वापर करुन शक्तीशाली कम्प्युटर तयार करण्याचा प्रयत्न आहे. गुगलच्या या विलो चीपबाबत तुमच्या मनात असे अनेक प्रश्न पडले असतील ना? जसे की, या चीपचा वापर कसा केला जाईल. चला तर मग अशा प्रश्नांची उत्तरे या 10 पॉंइट्सच्या माध्यमातून जाणून घेऊया...

1. गुगलकडून विकसित करण्यात आलेली ही क्वांटम विलो चीप भविष्यात कम्प्युटरची क्षमता बदलू शकते. क्वांटम कम्प्युटर विकसित करण्याच्या दिशेने हे एक पाऊल असल्याचे गुगलकडून सांगण्यात आले. विलो तात्काळ त्रुटी कमी करु शकते.

2. जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटरला 10 सेप्टिलियन किंवा 10,000,000,000,000,000,000,000,000 वर्षे लागतील, अशा प्रश्नांची उत्तर ही चीप केवळ 5 मिनिटांत देणार आहे, असा गुगलकडून दावा करण्यात आला आहे.

3. जगातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिक शक्तिशाली संगणक आवश्यक आहे, जो तयार करण्यासाठी अनेक वर्षे आणि अब्जावधी डॉलर्स लागतील. पण ही चिप भविष्यात क्वांटम कॉम्प्युटरची क्षमता पूर्णपणे बदलू शकते.

4. औषधांचा शोध, फ्यूजन एनर्जी आणि बॅटरी डिझाइन यांसारख्या क्षेत्रातील प्रयोगांसह एक उपयुक्त क्वांटम कम्प्युटर तयार करण्याच्या प्रवासात Google Willow ला एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहते.

5. क्वांटम चिप ही एक विशेष प्रकारची कॉम्प्युटर चिप आहे, जी क्वांटम मेकॅनिक्सची तत्त्वे, अणूंसारख्या अत्यंत लहान कणांचे सायन्स जाणून घेण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

6. नियमित चिप्स माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी 'बिट्स' (0 किंवा 1) वापरतात, तर क्वांटम चिप्स 'क्विट्स' वापरतात, जे एकाच वेळी 0 किंवा 1 किंवा दोन्ही असू शकतात. ही अनोखी क्षमता क्वांटम चिप्सना पारंपारिक कम्प्युटरपेक्षा अधिक वेगाने जटिल गणना हाताळण्यास अनुमती देते.

7. क्वांटम कॉम्प्युटिंग हे क्वांटम फिजिक्सच्या तत्त्वांवर आधारित संगणक तंत्रज्ञानाचा एक नवीन प्रकार आहे. यामध्ये कॉम्प्युटर बिट्सऐवजी क्यूबिट्सचा वापर केला जातो.

8. बीबीसीच्या एका अहवालानुसार पारंपारिक कम्प्युटरपेक्षा अधिक गतीने समस्यांचे निराकरण करण्यासाठी या क्वांटम चीपचा वापर केला जाऊ शकतो.

9. विलोने त्रुटी सुधारण्यात यश मिळवले आहे, परंतु तरीही त्याचा वापर हे एक मोठे आव्हान आहे.

10. विलो चिपचा वापर सुरुवातीला काही वास्तविक समस्या सोडवण्यासाठी केला जाईल, परंतु व्यावसायिक वापरात येण्यासाठी अनेक दशके लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT