COVID-19 Vaccine Dainik Gomantak
ग्लोबल

Covid-19 Vaccine Side Effects: कोरोना लसीचे दिसतायेत दुष्परिणाम; संशोधनात धक्कादायक खुलासा

Covid-19 Vaccine Side Effects: कोरोना महामारीने जगभर हाहाकार माजवला होता. सुमारे 70 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला.

Manish Jadhav

Covid-19 Vaccine Side Effects: कोरोना महामारीने जगभर हाहाकार माजवला होता. सुमारे 70 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. या महामारीपासून वाचण्यासाठी लोकांनी लसीकरण केले. आता लसीकरणाचे दुष्परिणाम समोर येत आहेत. लोकांच्या पाठीच्या कण्याला सूज येत आहे. याशिवाय, मज्जासंस्थेचे विकारही दिसून येत आहेत. एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे.

ग्लोबल व्हॅक्सिन डेटा नेटवर्कने अभ्यास केला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्लोबल व्हॅक्सिन डेटा नेटवर्कने हा अभ्यास केला आहे. कोरोना महामारीनंतर ब्रेन, ब्लड आणि हार्टवर विपरित परिणाम झाल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. अभ्यासात, संशोधकांनी ॲस्ट्राझेनेका लसीशी संबंधित नवीन दुष्परिणाम शोधून काढले आहेत. साइड इफेक्ट्समध्ये एन्सेफॅलोमायलिटिस आणि ट्रान्सव्हर्स मायलाइटिस यांचा समावेश होतो.

ऑस्ट्रेलियात अभ्यास केला

दरम्यान, हा अभ्यास ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) ग्लोबल व्हॅक्सिन डेटा नेटवर्कने केला आहे. या कालावधीत, 6.8 दशलक्ष म्हणजेच 60 लाखांहून अधिक लोकांचा समावेश होता ज्यांना ॲस्ट्राझेनेका लस मिळाली होती. तपासणीनंतर, एन्सेफॅलोमायलिटिस आणि ट्रान्सव्हर्स मायलाइटिस हे लोकांमध्ये दुष्परिणाम म्हणून पाहिले गेले.

लसीकरणानंतर...

ग्लोबल व्हॅक्सिन डेटा नेटवर्कचे सह-संचालक प्रोफेसर जिम बटरी यांच्या म्हणण्यानुसार, लसीचा व्यापक वापर केल्यानंतरच दुष्परिणाम दिसून आले आहेत. ते म्हणाले की, कोरोना संसर्गानंतर मायोकार्डिटिसचा धोका लसीकरणानंतर (Vaccination) जास्त असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT