Nobel Winner In Literature for 2022 Annie Ernaux Dainik Gomantak
ग्लोबल

Nobel In Literature: फ्रेंच लेखिका अॅनी अर्नो यांना नोबेल जाहीर

82 वर्षीय अॅनी यांचे बहुतांश साहित्य फ्रेंच भाषेत, ठराविक पुस्तकांचे इंग्रजीत अनुवाद

गोमन्तक डिजिटल टीम

Nobel In Literature: फ्रान्सच्या लेखिका अॅनी अर्नो (Annie Ernaux) यांना 2022 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे नोबेल प्राईझ वीक सुरू असून या वीकच्या चौथ्या दिवशी साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

82 वर्षीय अॅनी यांनी जवळपास 40 पुस्तके लिहिली आहेत. अॅनी यांच्या साहित्यात साहस आणि भावनांचा संगम दिसून येतो. त्यांची भाषा खूपच सोपी आहे, असे नोबेल पुरस्कार समितीने त्यांचे नाव घोषित करताना म्हटले आहे.

नोबेल समितीने म्हटले आहे की, अॅनी यांची भाषा खूपच सोपी आहे. आणि सोप्या भाषेत त्यांनी गंभीर मुद्यांची चर्चा त्यांच्या लिखाणातून केली आहे. त्यांच्या साहित्यात साहस आणि संवेदनशीलता दिसून येते. त्यांनी प्रत्येक वर्ग आणि घटकाला आपल्या लिखाणात सामावून घेतले आहे.

अर्नो यांच्या एखूण साहित्यसंपदेतील 90 टक्के पुस्तके फ्रेंच भाषेत आहेत. त्यातील काही पुस्तकांचा इंग्रजीत अनुवाद झाला आहे. यात पॅशन सिम्पल, ला पॅलेस, द इयर्स, अ फ्रोजन वुमन, हॅपनिंग्ज आणि डु व्हॉट आर द एल्स या पुस्तकांचा समावेश आहे.

दरम्यान, नोबेल वीकमध्ये आत्तापर्यंत आत्तापर्यंत फिजिक्स, केमिस्ट्री, वैद्यकीय आणि साहित्यातील नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. सर्वात शेवटी 10 ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रातील नोबेल प्राईझची घोषणा केली जाईल. या पुरस्कारांचे वितरण डिसेंबरमध्ये स्टॉकहोममध्ये केले जाते, केवळ शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार नॉर्वेमध्ये प्रदान केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT