Cabinet Minister Arrested Dainik Gomantak
ग्लोबल

इंडोनेशियाच्या माजी कॅबिनेट मंत्र्यांला लाचखोरीच्या आरोपाखाली 12 वर्षांसाठी शिक्षा

लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप या मंत्र्यावर (Cabinet Minister) करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

इंडोनेशियामधील न्यायालयाने सोमवारी माजी कॅबिनेट मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप या मंत्र्यावर करण्यात आले होते. माजी सामाजिक व्यवहार मंत्री जुलियारी पीटर बटुबारा (Juliari Peter Batubara) यांना डिसेंबरमध्ये अटक करण्यात आली होती.

यापूर्वी, माजी मंत्री बटुबारा यांना भ्रष्टाचारविरोधी प्राधिकरणात सरकारच्या कोविड -19 मदत वितरण प्रक्रियेत भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना लाचखोरीच्या आरोपांचा सामना करावा लागत होता. त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन आयोगाच्या मुख्यालयालामध्ये त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्यावर दोन पुरवठादार कंपन्यांकडून दोन अधीनस्थांद्वारे 1.2 दशलक्ष डॉलर्स लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचबरोबर लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाने या प्रकरणात मोठ्या प्रमाणात रोख रक्कमही जप्त केली होती. त्यानंतर राष्ट्रपती जोको विडोडो (President Joko Widodo) यांनी त्वरित या मंत्र्यावर कारवाई करत पदच्युत केले.

सागरी आणि मत्स्यव्यवसाय मंत्री एधी प्रबोवो लॉबस्टर निर्यात प्रकरणात लाच घेतल्याप्रकरणी दोषी आढळण्यापूर्वी डिसेंबरमध्ये दोन आठवड्यांच्या आत भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरलेले बटुबारा हे दुसरे हे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी हे पैसे अमेरिकेत लक्झरी शॉपिंग करण्यासाठी वापरले असल्याचे सांगण्यात येत आहे. अशी भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत असल्याने इंडोनेशियाच्या अध्यक्षांच्या प्रतिमेला धक्का लागत आहेत. अध्यक्ष विडोडो देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोहीम राबवत आहेत. इतर दोन कॅबिनेट मंत्र्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे दोघेही भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT