Typhoon Noru Dainik Gomantak
ग्लोबल

Typhoon Noru: फिलिपाईन्समध्ये 'टायफून नोरू'चा हाहाकार; पाच बळी, अनेकजण छतावर अडकले

एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना छातीभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फिलिपाईन्सला (Philippines) 'टायफून नोरू' वादळाचा (Typhoon Noru) जोरदार फटका बसला आहे. यामध्ये पाच बचाव कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विविध शहरात अनेकजण घराच्या छतावर अडकून पडले आहेत तर, अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. फिलिपाईन्सची राजधानी मनिला'च्या (Manila) उत्तरेस सॅन मिगुएल जिल्ह्यात सध्या अतिशय भिषण परिस्थिती असल्याचे बीबीसीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

Typhoon Noru

फिलिपाईन्सची निम्म्याहून अधिक लोकसंख्या लुझोन येथे राहते. येथील 110 दशलक्ष लेकसंख्येला टायफूनचा जोरदार फटका बसला आहे. याठिकाणी अनेक रहिवासी छतावर अडकल्याचे दिसून आले. तर, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना छातीभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. लुझोन भागात 240 कि.मी (149mph) वेगाने वारे वाहत आहे. आत्तापर्यंत 74,000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. राजधानी मनिलाच्या रहिवाश्यांना यापूर्वीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पण, आतापर्यंत कोणतीही मोठी हानी किंवा मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Typhoon Noru

मनिलाच्या पूर्वेकडील क्वेझॉन प्रांतात, मच्छिमारांना पूर्वी समुद्राकडे जाण्यापासून रोखण्यात आले. विमान उड्डाणे आणि फेरी सेवा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. लुझोनवर, अध्यक्ष मार्कोस यांनी सर्व सरकारी काम बंद करण्याचे आदेश दिले. तसेच, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. सोमवारी देशाचा स्टॉक एक्स्चेंजवर देखील मोठा परिणाम दिसून आला व सर्व कामकाज स्थगित करण्यात आले. ऊर्जा मंत्रालयाने सर्व ऊर्जा-संबंधित उद्योगांना हाय अलर्टवर ठेवले आहे.

Typhoon Noru

नदीची पातळी, पूल आणि डोंगरावर भूस्खलन यामुळे बचाव कार्यात अडथळे येऊ शकतात. पॅसिफिक महासागरातील 7,000 पेक्षा जास्त बेटांचा फिलीपिन्स हा द्वीपसमूह वादळांसाठी अत्यंत असुरक्षित आहे. त्यात वार्षिक सरासरी 20 उष्णकटिबंधीय वादळे येतात.

मागील वर्षी डिसेंबर 2021 मध्ये टायफून रायने देशात धुमाकूळ घातला. यामध्ये अंदाजे 400 लोक मरण पावले होते. तर, 2013 मध्ये आलेल्या सर्वात शक्तिशाली टायफून हैयान या वादळामुळे 6,300 लोक मारले गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT